AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एआय समिटमध्ये युवक काँग्रेसची निदर्शने, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांचा घरचा आहेर म्हणाल्या की….

गेल्या शुक्रवारी राजधानी दिल्लीत एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी शर्टलेस निदर्शने केली होती. त्याविरोधात समाजाच्या सर्वस्तरातून टीका होत आहे. आता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेच अल्वा यांनी टीका केली आहे.

एआय समिटमध्ये युवक काँग्रेसची निदर्शने, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांचा घरचा आहेर म्हणाल्या की....
Congress leader Margaret Alva
| Updated on: Feb 23, 2026 | 8:03 PM
Share

एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत (India AI Summit 2026) युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या शर्टलेस प्रोटेस्टवर सर्वस्तरातून टीका होत आहे. विरोधी पक्षातील अनेक राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी या निदर्शनावर प्रचंड टीका केली आहे. आता या यादीत काँग्रेस नेते देखील सामील झाले आहेत. शर्टलेस निदर्शनावर आता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांनी ही काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. मार्गारेट अल्वा यांनी अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयोजनाचा मान राखायला हवा आणि सर्वांमध्ये जबाबदारीची भावना असायला हवी अशी टीका अल्वा यांनी केली आहे.

या परिषदेत युवक काँग्रेसने केलेल्या निदर्शनाच्या प्रकाराबद्दल काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या माजी केंद्रीय मंत्री मार्गारेट अल्वा यांनी म्हटले की मला वाटते अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय इव्हेंटचा मान राखला गेला पाहिजेत.प्रत्येकाने शिस्त दाखवली पाहिजे आणि जबाबदारी देखील ओळखली पाहिजे.

या प्रकरणात आता दिल्ली पोलिसांनी पाचवी अटक केली आहे. शुक्रवारी राजधानी दिल्लीत एआय इम्पॅक्ट समिटमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शर्टलेस निदर्शने केली. या प्रकरणात ५ वी अटक म्हणून मध्य प्रदेशातील ग्वालियरमधून जितेंद्र यादव या कार्यकर्त्याला अटक झाली आहे.

भारत मंडपममध्ये गेल्या शुक्रवारी समिट सुरु असताना एका प्रदर्शन हॉलमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या एका गटाने शर्ट काढून निदर्शने केली. या तरुणांनी भारत आणि अमरिका व्यापार कराराच्या विरोधात घोषवाक्य लिहिलेले टी-शर्ट या तरुणांनी घातले होते. यावेळी सुरक्षा रक्षकांना या तरुणांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केली.

दिल्ली पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या युवक काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना त्याच दिवशी अटक केली होती. त्यानंतर कोर्टाने या आरोपींना पाच दिवसांच्या पोलिस रिमांडमध्ये पाठवले होते. भारतीय जनता पार्टी ( बीजेपी ) ने जागतिक व्यासपीठावर भारताची छबी खराब करणारे निंदनीय कृत्य असल्याचे म्हटले आहे. युवक काँग्रेसने या आंदोलनाचे समर्थन करत राष्ट्रीय हितांच्या संरक्षणाच्या हेतूने केलेले हे शांतता पूर्ण निदर्शन असे म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री मायावती आणि वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या सह पश्चिम बंगालच्या मंत्र्यानी देखील या निदर्शनावर टीका केली आहे.

स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या निदर्शनाबद्दल काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. या पक्षाने एका जागतिक व्यासपीठाच्या आयोजनाला स्वत:चा घाणेरडा आणि नग्न राजकीय आखाडा केल्याची टीका मोदी यांनी केली आहे. ते म्हणाले की संपूर्ण देशाच्या स्वाभीमानाची घटना घडत असताना काँग्रेस आणि त्यांच्या लोकांनी काय केले ? तर आपले घाणेरडे आणि नग्न राजकारणाचा आखाडा तयार केला. समारंभ स्थळावर परदेशी पाहूण्याच्या समोर काँग्रेसच्या अनेक नेते कपडे उतरवून उभे राहिले.

देशाचा सन्मान महत्वाचा

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शर्ट उतरवून केलेल्या निदर्शनावर पश्चिम बंगालच्या माहिती तंत्रज्ञान मंत्री बाबुल सुप्रियो यांनीही टीका केली आहे. राजकीय लढाई देशाच्या सन्मानाचा बळी देऊन होऊ शकत नाही अशीही टीका त्यांनी केली.

शुक्रवारी नवी दिल्लीतील भारतमंडपम येथे एआय समिट सुरु असताना युवक काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक हॉल नंबर ५ च्या लॉबीत घुसले आणि आपल्या टी शर्टच्या खाली टी-शर्ट काढून ते हातात दाखवत घोषणा देऊ लागले. आत जाण्यासाठी निदर्शकांनी क्यूआर कोड मिळवण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले होते.

अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.