AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Cylinder Price : 1 एप्रिलपासून घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त, तुमच्या भागात LPG Cylinder ची किंमत किती?

सर्वसामान्य नागरिकांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. आता 1 एप्रिलपासून LPG Cylinder ची किंमत 10 रुपयांनी कमी होणार आहे.

LPG Cylinder Price : 1 एप्रिलपासून घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त, तुमच्या भागात LPG Cylinder ची किंमत किती?
सिलिंडर खरेदी करा फक्त 9 रुपयात
| Updated on: Mar 31, 2021 | 9:53 PM
Share

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. मागील अनेक दिवसांपासून घरगुती गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ होतेय. मात्र, आता 1 एप्रिलपासून LPG Cylinder ची किंमत 10 रुपयांनी कमी होणार आहे. त्यामुळे मुंबईत 819 रुपयांना मिळणारा घरगुती गॅस सिलिंडर आता 809 रुपयांना मिळणार आहे. देशभरात घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 10 रुपयांनी कमी झालीय. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (Indian Oil Corporation LTD) याबाबत घोषणा केलीय (Decrease in LPG Cylinder price from 1 April 2021 in India).

नोव्हेंबर 2020 पासून पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ झालीय. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलंय. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेला लॉकडाऊन, घटलेले उत्पन्न आणि कोरोनावरील उपचाराचं ओझं अशा कात्रीत नागरिक सापडले आहेत. त्यातच इंधन दरवाढीने नागरिकांचं दैनंदिन जगणं कठीण केलंय. त्यामुळे आता झालेली 10 रुपयांची दर कपात काहीसा दिलासा देणार आहे. असं असलं तरी अजूनही घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 809 रुपये असल्याने सामान्यांच्या खिशाला बसणारी कात्री कमी झाली असली तरी कायम आहे.

मागील काही आठवड्यांमध्ये गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल 125 रुपयांची वाढ झालीय. त्यामुळे त्या तुलनेत कमी होणारी 10 रुपयांची दरकपात नगन्य मानली जात आहे. कपातीआधी गॅस सिलिंडरचे दर दिल्लीत 819 रुपये, कोलकाता 845.50 रुपये, मुंबईत 819 रुपये आणि चेन्नईत 835 रुपये होते. दर कपातीनंतर हे दर दिल्लीत 809, कोलकातामध्ये 835.50 रुपये, मुंबईत 809 रुपये झालेत. झारखंडची राजधानी रांचीत हे दर 876.50 रुपये होते ते आता 866.50 रुपये झालेत.

पेट्रोल-डिझेलच्या किमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या किमती देखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. सध्या राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 90.56 रुपये प्रतिलिटर आहेत. तर डिझेलचे दर 80.87 रुपये प्रतिलिटर आहेत. देशात काही ठिकाणी पेट्रोलचे दर 100 रुपयांच्याही पार गेले होते. मागील आठवड्यात पेट्रोलच्या दरातही काहीशी कपात झालीय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याने हे दर कमी झाल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत.

हेही वाचा :

नव्या वर्षात गॅसचा भाव वाढला आणि गावात पुन्हा चूलीचा धुराडा

आता अ‍ॅड्रेस प्रूफशिवाय LPG सिलिंडर खरेदी करता येणार, जाणून घ्या प्रोसेस

LPG गॅस सिलिंडर बुक करण्याची जबरदस्त पद्धत; थेट 50 रुपयांची बचत

व्हिडीओ पाहा :

Decrease in LPG Cylinder price from 1 April 2021 in India

Follow Us
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.