
उद्योगपती आनंद महिंद्रा यांचं ट्विटर हॅण्डल म्हणजे रंजक आणि मजेशीर ट्विट्सचा खजिना आहे. तो अनेकदा असे ट्विट्स ट्विट करतो, जे लोकांना शेअर करायला नक्कीच आवडतं. मात्र अनेक वेळा युजर्सचे मजेशीर ट्विट शेअर करत ते आपलं मत द्यायला विसरत नाही. यावेळी त्यांनी नॉर्वेचे राजदूत एरिक सोलहाइम यांचे ट्विट रिट्विट करून आपले मत मांडले.
एरिकने आपल्या ट्विटर अकाऊंटवर डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन शेअर केलं आहे, त्यात रुग्णाचं नाव आनंद लिहिलेलं आहे आणि त्यात कम्प्युटर आणि मोबाइल टाकण्याचा सल्ला दिला आहे.
यावर आनंद महिंद्रा यांनी चिमटे काढत एक गमतीशीर गोष्ट लिहिली, जी लोकांकडून खूप पसंत केली जात आहे.
एरिक सोलहाइमने ट्विटरवर लिहिले, ‘उपचार सल्ला’. या ट्विटवर काही युझर्सनी आनंद महिंद्रांना टॅग केलं आणि त्यानंतर आनंद महिंद्रांनी आपली प्रतिक्रिया दिली.
या ट्विटवर आनंद महिंद्रा यांनी आपल्या पत्नीचाही उल्लेख केलाय. काही काळापूर्वी त्यांच्या पत्नीनेही आपला कम्प्युटर आणि फोन फेकून द्यावा, असा सल्ला दिला होता असं त्यांनी त्यात सांगितलंय.
आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘एरिक सोलहाइम असे दिसते की तुम्ही मलाच उद्देशून हे ट्विट करत आहात. हे माझ्या पत्नीने काही काळापूर्वीच माझ्यासाठी लिहून ठेवले होते आणि तिच्याकडे वैद्यकीय पदवीही नाही.”
Looks like you were tweeting this to me, @ErikSolheim ??
By the way, my wife prescribed this for me aeons ago. And she doesn’t even possess a medical degree…? https://t.co/UOu5lp54sE— anand mahindra (@anandmahindra) November 15, 2022
आनंद महिंद्रा यांच्या ट्विटवर अनेक युझर्सनी आपलं मत मांडलं. एका युझरने ट्विट केले की, “हे निश्चित आहे की ते डॉक्टरांनी लिहिले नाही, कारण हस्ताक्षर इतके स्वच्छ असू शकत नाही.”