AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलासोबत दफन केलं स्वर्गाचं तिकीट, 1750 वर्ष जुनं रहस्य; अपार्टमेंटचं खोदकाम करताच…

बल्गेरियात अपार्टमेंट खोदकामात 1750 वर्षांपूर्वीच्या रोमन मुलाची कबर सापडली. सोन्याचे डुल आणि 274-275 ईसवी सनाचं एक दुर्मिळ कांस्य नाणंही मिळालं. प्राचीन रोमन परंपरेनुसार, हे नाणं मृत्यूनंतरच्या प्रवासासाठी नावाडी कॅरॉनला द्यायचं 'स्वर्गाचं तिकीट' होतं.

मुलासोबत दफन केलं स्वर्गाचं तिकीट, 1750 वर्ष जुनं रहस्य; अपार्टमेंटचं खोदकाम करताच...
Ancient CoinImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 23, 2026 | 10:29 PM
Share

बुलगारियामध्ये काळ्या समुद्राच्या जवळ आर्कियोलॉजिस्टसना रोमन काळातील एका मुलाची कबर सापडली आहे. स्टारा जागरा शहरात एका नव्या अपार्टमेंट आणि पार्किंग प्रोजेक्टच्या सर्व्हेच्या दरम्यान ही कबर सापडली. या कबरीत कानातील सोन्याची सुंदर डुलं आणि एक छोटं ब्रॉन्जचं नाणंही सापडलं. या दुर्लभ नाण्याला अंटोनिनियानस म्हटलं जातं. हे नाणं 274 वा 275 ईसवी सनाच्या आसपासचं असण्याची शक्यता संशोधनातून वर्तवली गेली आहे. प्राचीन रोम आणि ग्रीक मान्यतेनुसार, मृत्यूनंतर आत्म्याला नदी पार करणाऱ्या नावाड्याला भाडं द्यावं लागायचं. त्यामुळेच शोकाकूल कुटुंबाने मुलाचा स्वर्गाचा प्रवास सोपा व्हावा म्हणून तिकीट म्हणून हे नाणं कबरीत ठेवलं होतं.

प्राचीन ग्रीक आणि रोमन परंपरांमद्ये मृत्यूनंतरच्या जीवनाबाबत खास परंपरेला मान्यता दिली होती. या मान्यतेनुसार, आत्मा स्वर्गात जाण्यासाठी कॅरन नावाचा नावाडी एक पौराणिक नदी पार करून द्यायचा. ही नदी पार करण्याच्या बदल्यात नावाड्याला शुल्क द्यावे लागायचे. संशोधकांच्या मते, कबरीतील मुलाजवळचं हे ब्रॉन्जचं नाणं त्या नावाड्याला भाडं म्हणून देण्यासाठी कबरीत ठेवलं असावं. दु:खी कुटुंबाने मुलाच्या सुरक्षितप्रवासासाठी कबरीत नाणं ठेवलं होतं, हा त्याचाच पुरावा आहे, असंही संशोधकांचं म्हणणं आहे.

135 सांगाडे सापडले

स्टारा जागरामध्ये जमिनीखाली एक मोठं कब्रस्तान सापडलं आहे. शहराच्या जुन्या भिंतीच्या बाहेर हे कब्रस्तान सापडलंय. या कब्रस्तानाचा वापर तब्बल तीन शतके केला जायचा. या ठिकाणी खोदण्यात आलेल्या 135 कबरींपैकी या मुलाची कबर वेगळीच होती. या मुलाची कबर सजवलेली होती. त्याच्यासोबत सोन्याची डुलं आणि थ्रेसचं ब्रॉन्जचं नाणं होतं. मात्र, या मुलाचं वय आणि मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. नाण्यावरील तारखेमुळे या मुलाचा मृत्यू 274 वा 275 ईसवी सनाच्या आसपास झाला असावा असं सांगितलं जातं.

कनेक्शन काय?

रोमन साम्राज्य आपल्या भरभराटीच्या काळात 19 लाख वर्ग मैलापेक्षा अधिक परिसरात फैलावलेलं होतं. रोमने 46 ईसवी सनाच्या वेळी थ्रेस परिसरावर ताबा मिळवला होता. त्यानंतर सम्राट ट्राजन यांची आठवण म्हणून स्टारा जागराचं नाव बदलून उल्पिया ऑगस्टा ट्रायना ठेवण्यात आलं. हे शहर थ्रेसचं एक प्रमुख केंद्र बनलं होतं. दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकामध्ये या शहराला स्वत:ची करन्सी निर्माण करण्याची परवानगी मिळाली होती. सुमारे 1750 वर्षानंतर याच ऐतिहासिक शहरातील एका आवशेषातून हा दुर्मीळ शोध लागला आहे.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…