ते जे फुलाच्या आत दिसतंय ते “मूल” आहे का? 99% लोक ठरले अपयशी

असं वाटतं की, एखादं मूल फुलाच्या आत आडवं पडलेलं आहे आणि त्याच्याभोवती कापड गुंडाळलेलं आहे.

ते जे फुलाच्या आत दिसतंय ते मूल आहे का? 99% लोक ठरले अपयशी
anguloa uniflora orchids
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 18, 2022 | 5:58 PM

या अनोख्या फुलाची हल्ली सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. या फुलाकडे पाहून असं वाटतं की, जणू एखादं मूल त्या फुलाच्या आत लपलेलं आहे. बहुतेक लोकांना या विचित्र फुलाचे नाव सांगता येत नाही. याचं उत्तर फक्त प्रतिभावंतांनाच माहीत असतं. या फुलाचे नाव “अंगुलोआ युनिफ्लोरा ऑर्किड्स” आहे. बाजारात ते खूप महाग आहे.

अंगुलोआ युनिफ्लोरा ऑर्किड्सची खास गोष्ट अशी की, एकदा हे फूल उमललं की तुम्ही त्याकडे कोणत्याही बाजूने बघितलं तरी प्रत्येक वेळी असं वाटतं की, एखादं मूल फुलाच्या आत आडवं पडलेलं आहे आणि त्याच्याभोवती कापड गुंडाळलेलं आहे. हे फूल अतिशय सुंदर दिसते.

दक्षिण अमेरिका खंडातील चिली आणि पेरू देशांमध्ये अँगुलोआ युनिफ्लोरा ऑर्किड नावाच्या या फुलाचा शोध लागला होता.

हिप्पोलिटो रुईझ लोपेझ आणि अँटोनियो पेव्हन जिमेनेझ यांनी याचा शोध लावला. हे अद्वितीय फूल शोधण्यात दोन्ही लोकांना अनेक वर्षे लागली. 1788 साली या अद्वितीय फुलाचा म्हणजेच अंगुलोआ युनिफ्लोरा ऑर्किडचा शोध लागला.

विशेष म्हणजे अँगुलोआ युनिफ्लोरा ऑर्किड या फुलाला प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ डॉन फ्रान्सिस्को दे अंगुलो यांचे नाव देण्यात आले. हे फूल प्रामुख्याने कोलंबिया, इक्वाडोर आणि वेनेजुएला मध्ये आढळते.

अँगुलोआ युनिफ्लोरा ऑर्किडला ट्यूलिप ऑर्किड म्हणूनही ओळखले जाते. याची लांबी 18 ते 24 इंच दरम्यान आहे. या फुलाचा आकार अतिशय गुंतागुंतीचा आहे. हे फूल पांढऱ्या आणि क्रीम रंगाचं असतं.