IND vs SA : टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका चौथ्या टी 20I सामन्याच्या वेळेत बदल? जाणून घ्या किती वाजता सुरुवात होणार
India vs South Africa 4th T20I Live Streaming : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ चौथ्या टी 20I सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. हा सामना कुठे होणार? जाणून घ्या सर्वकाही.

आयपीएल 2026 मिनी ऑक्शननंतर आता पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या टी 20I मालिकेकडे वळलं आहे. उभयसंघात एकूण 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. तर चौथा सामना हा निर्णायक असा ठरणार आहे. टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका विजयाचा दावा मजबूत केला आहे. त्यामुळे पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचं टेन्शन वाढलं आहे. दक्षिण आफ्रिकेला मालिकेतील आव्हान कायम राखायचं असेल तर कोणत्याही स्थितीत चौथ्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. हा चौथा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा टी 20I सामना कधी?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा टी 20I सामना बुधवारी 17 डिसेंबरला होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा टी 20I सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा टी 20I सामना लखनौमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथ्या टी 20I सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथ्या टी 20I सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल. तसेच टीव्ही9 मराठी वेबसाईटवर सामन्याबाबत अपडेट जाणून घेता येतील.
शुबमनच्या कामगिरीकडे असणार लक्ष
दरम्यान चौथ्या टी 20i सामन्यात उपकर्णधार शुबमन गिल याच्या कामगिरीकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. शुबमनने पहिल्या 2 सामन्यात एकूण 21 धावा केल्या आहेत. तसेच शुबमनला तिसऱ्या सामन्यात सन्मानजनक धावा केल्या. मात्र शुबमनच्या लौकीकाला ती खेळी साजेशी नव्हती. त्यामुळे शुबमनकडून चौथ्या सामन्यात चाहत्यांना मोठी खेळी अपेक्षित आहे.
