
Baba Vanga Prediction On Health : प्रत्येक माणूस आज डिजिटल युगाचा घटक आहे. इंटरनेटमुळे जग हे खेडे झाले आहे. लोकांमधील संवाद कमी होत आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्यापासून तर घरातील दोन व्यक्तींमधील अबोला सुद्धा वाढला आहे. सध्याच्या या तंत्रज्ञान युगात मानव यंत्रासारखाच झाला नाही तर यंत्रांचा गुलाम झाल्याचे बोलले जाते. त्यातच बाबा वेंगाची ही भविष्यवाणी तर जणू त्याला दुजोराच देत आहे.
स्मार्टफोन म्हणजे दुखण्याला आमंत्रण
स्मार्टफोन तर गुलामीचे एक प्रतिक झाल्याचे म्हटले जाते. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेत. रस्त्याने चालण्यापासून ते वाहन चालवताना अनेक जण या स्क्रीनवर खिळलेले असतात. जेवणापासून ते टॉयलेटपर्यंत स्मार्टफोन काही त्यांच्या हातून सुटत नाही अशी पिढी आपल्यासमोर आहे. हे छोटसं उपकरण पण त्याने मानवाचे संपूर्ण आयुष्य व्यापले आहे. स्मार्टफोन जणू मानवाची मूलभूत गरज ठरला आहे. त्याविषयीची बाबा वेंगाचे भाकीत अगदी अचूक ठरल्याचा दावा खरा ठरला आहे.
प्रत्येक वयोगट स्मार्टफोनच्या विळख्यात
प्रत्येक वयोगटाला स्मार्टफोनची सवय लागली आहे. मोबाईलशिवाय राहू शकत नाहीत, असे अनेक अबालवृद्ध आपल्यासमोर आहेत. बालकांचा अधिकार आणि संरक्षण आयोगाने (NCPCR) एक अहवाल नुकताच प्रकाशित केला. त्यातील दाव्यानुसार, देशातील जवळपास 24 टक्के मुलं ही झोपण्यापूर्वी स्मार्टफोनचा वापर करतात. स्क्रीन टाईम वाढल्यापासून त्यांच्यात चिंता, नैराश्य वाढलेले आहे. त्यांच्यात एकाग्रतेचा अभाव दिसून आला आहे. ही मुलं मैदानं, मित्र विसरली आहेत. त्यांना जगातील घडामोडींशी काहीच देणेघेणे नसते.
तर अनेक लोकांना रात्री उशीरा मोबाईल पाहत असल्याने, सतत सोशल मीडियावर पडीक राहत असल्याने अनेक आजारांनी ग्रस्त आहेत. डोळ्यांची जळजळ, थकवा हा नित्याचाच भाग आहे. पाठीचे, मानेचे, खांद्याचे दुखणे वाढले आहे. त्यांची चिडचिड वाढली आहे. एकटेपणा वाढलेला आहे. रोजच्या आयुष्यात मोबाईलचा सर्रास वापर अनेकांसाठी अस्वस्थता वाढवणारा आहे. मोबाईल चाळल्याशिवाय या लोकांना चैन पडत नाही. चुकून नेटवर्क गेले तर ही लोक भलं काही तरी मोठं हरवल्यासारखी अस्वस्थ होतात. बैचेन होत असल्याचे समोर आलेले आहे. बाबा वेंगाने याविषयी मानवाला अगोदरच भाकिताद्वारे सतर्क केले होते. एक छोटंस हातातील यंत्र मानवाला त्याच्याशी जखडून ठेवेल हे तिचे भाकीत तंतोतंत खरं उतरलं आहे. इतकेच नाही तर नातेसंबंध तुटण्यातही स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. मानवाचा मनावरील ताबा सुटल्याने त्याचे पाऊल वाकडे पडत आहे. त्यामुळे अनेकांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. म्हणजे आरोग्यासोबतच मानवाच्या वैयक्तिक आयुष्यातही हे छोटे यंत्र मोठे वादळ आणत आहे.
डिस्क्लेमर : बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.