Video | अजगराने विळख्यात मांजरीला पकडले, नंतर जिवंतपणे गिळले, थरारक व्हिडीओ एकदा पाहाच !

या व्हिडीओमध्ये एका मोठ्या अजगराने मांजरीला गिळंकृत केलं आहे. या घटनेला कॅमेऱ्यात कैद करण्यात आले असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video | अजगराने विळख्यात मांजरीला पकडले, नंतर जिवंतपणे गिळले, थरारक व्हिडीओ एकदा पाहाच !
python viral video
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jul 29, 2021 | 12:07 AM

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या एक विचित्र आणि आश्चर्यचकित करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. या व्हिडीओमध्ये एका मोठ्या अजगराने मांजरीला गिळंकृत केलं आहे. या घटनेला कॅमेऱ्यात कैद करण्यात आले असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (big python swallowing cat video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक मोठा अजगर दिसत आहे. हा अजगर अतिशय मोठा आणि भीती वाटावा असा आहे. अजगराला पाहून आजूबाजूचे लोक भयभीत झाले आहेत. या व्हिडीओमध्ये जे दिसत आहे, ते आश्चर्यात पाडणारे आहे. कारण या व्हिडीओमध्ये जो अजगर दिसत आहे, तो एका मांजरीला जिवंतपणे खात आहे. त्याने आपल्या शक्तीचा वापर करुन मांजरीला पकडले आहे. तसेच आपल्या विळख्यात मांजरीला पकडून त्याने बघता बघता अर्धी मांजर गिळंकृत केली आहे. व्हिडीओत दिसणारा अजगर बाहेर राहिलेली मांजरसुद्धा खाऊन घेत असल्याचे आपल्याला दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा सर्व थरार बाजूला उभा असलेल्या एका माणसाने कॅमेऱ्यात कैद केला आहे. नंतर हाच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा अतिशय अद्भूत नजारा असल्याचे एका नेटकऱ्याने म्हटलेय. व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला ट्विटरवर @kumarayush084 या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

‘ओsss शेठ’ नादच केलाय थेट, महाराष्ट्राचं नवं सुपरहिट गाणं ऐकलंत का? राज ठाकरेंच्या हस्तेही सत्कार

Video | लाल साडीत महिलेच्या कोलांट उड्या, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Video | निरागस चिमुकल्याचे बोबडे बोल, 17 सेकंदाच्या गायत्री मंत्राला ऐकून नेटकरी मंत्रमुग्ध, व्हिडीओ पाहाच

(big python swallowing cat video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें