Video | बसवर बसून तरुणांची टवाळखोरी, ब्रेक दाबताच धाडकन रस्त्यावर पडले, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच !

या व्हिडीओमध्ये एका बसवर क्षमतेपेक्षा जास्त तरुण बसलेले आहेत. याच तरुणांची ऐनवेळी चांगली फजिती झाली आहे.

Video | बसवर बसून तरुणांची टवाळखोरी, ब्रेक दाबताच धाडकन रस्त्यावर पडले, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच !
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jul 27, 2021 | 7:35 PM

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. कधी या मंचावर मजेदार व्हिडीओ व्हायरल होतात. तर काधी काही व्हिडीओ हे आपल्याला चांगली माहिती देणारे असतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ मात्र तुम्हाला खळखळून हसवणारा आहे. या व्हिडीओमध्ये एका बसवर क्षमतेपेक्षा जास्त तरुण बसलेले आहेत. याच तरुणांची ऐनवेळी चांगली फजिती झाली आहे. (people fell down who seated on bus funny video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा विशेष आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुण एका बसवर बसल्याचे दिसत आहे. बसवर बसून हे तरुण मंडळी टवाळखोरपणा करत आहेत. बसवर बसून इकडे तिकडे हातवारे करत हे तरुण ओरडत आहेत. याच बससमोर दोन तरुण एका दुचाकीवर बसले आहे. दुचाकी घेऊन ते दोघे बससमोर चालत आहेत. मात्र, यावेळी दुचाकीस्वाराने अचानकपणे ब्रेक दाबले आहे.

पंधरा ते वीस मुलं जमिनीवर धाडकन कोसळले

दुचाकीस्वाराने ब्रेक दाबल्यामुळे बसचालकानेही जोरात जागेवरच ब्रेक दाबले आहे. परिणामी वर बसलेली टवाळखोर मुलं थेट रस्त्यावर धाडकन पडले आहेत. ब्रेक दाबल्यानंतर जवळपास पंधरा ते वीस मुलं जमिनीवर धाडकन कोसळल्याचे आपल्याला दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर तो काही क्षणांत व्हायरल झाला आहे. लोक हा व्हिडीओ पाहून खळखळून हसत आहेत. तसेच मजेदार प्रतिक्रियासुद्धा देत आहेत. व्हायरल होणारा हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या व्हिडीओला आयपीएस रुपीन शर्मा यांनी त्यांच्या अकाऊंटवर शेअर केले आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक केले जात आहे.

इतर बातम्या :

Video | बॉसने फटकारलं म्हणून तरुणी चिडली, थेट आत्महत्या करण्याचा प्रयत्न, थरारक व्हिडीओ व्हायरल

Video | सांगलीत पुरामुळे घरं नेस्तनाबूत, झाडं उन्मळून पडली, मगरही आली रस्त्यावर, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video | गुलाबजाम घेऊन नवरदेव नवरीकडे आला, पण नथ आडवी आली, पुढे काय झालं ?

(people fell down who seated on bus funny video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें