Bachpan Ka Pyaar : ‘बचपन का प्यार’ फेम सहदेवचं नशीब उघडलं, लवकरच झळकणार बादशाहच्या गाण्यात?

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये शाळेचा गणवेश परिधान केलेला एक मुलगा आपल्या शिक्षकांसमोर मोठ्या आवाजात 'बचपन का प्यार भूल नहीं जाना रे' गाताना दिसत आहे.  हे गाणे गाणार्‍या मुलाचं नाव सहदेव आहे, जो छत्तीसगडच्या सुकमाच्या छिंदगड ब्लॉकमध्ये राहतो. ('Bachpan Ka Pyaar' fame Sahadev will soon shine in Badshah's song?)

Bachpan Ka Pyaar : 'बचपन का प्यार' फेम सहदेवचं नशीब उघडलं, लवकरच झळकणार बादशाहच्या गाण्यात?
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: VN

Jul 25, 2021 | 5:15 PM

मुंबई : अनेकदा काही गाणी सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतात. त्यानंतर सगळीकडे ही गाणी धुमाकूळ घालत असतात. गेल्या काही दिवसांपासून ‘बचपन का प्यार’ (Bachpan ka Pyaar) हे गाणं सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ही गाणी सर्वत्र शेअर केली जात असताना अनेक सेलेब्सही या गाण्यावर जोरदार रिल बनवत आहेत. आता हे गाणं गाणाऱ्या त्या मुलाला बादशहानं बोलावलं आहे.

अलीकडेच बॉलिवूड गायक बादशहानंही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो बचपन का प्यार या गाण्यावर धमाल करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आता बादशाहनं जे केलं आहे याबद्दल सगळीकडे त्याचं कौतुक करण्यात येत आहे.

बादशाहनं बोलावलं

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये शाळेचा गणवेश परिधान केलेला एक मुलगा आपल्या शिक्षकांसमोर मोठ्या आवाजात ‘बचपन का प्यार भूल नहीं जाना रे’ गाताना दिसत आहे.  हे गाणे गाणार्‍या मुलाचं नाव सहदेव आहे, जो छत्तीसगडच्या सुकमाच्या छिंदगड ब्लॉकमध्ये राहतो.

View this post on Instagram

A post shared by ABP News (@abpnewstv)

सोशल मीडियावर असं म्हटलं जात आहे की सहदेवचा हा व्हिडिओ दोन वर्ष पूर्वीचा आहे. आता एबीपी न्यूजच्या व्हिडिओनुसार, बादशाहनं स्वतःच या मुलाशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आहे आणि एवढंच नाही तर रॅपरनं त्याला भेटण्यासाठी चंदीगडला बोलावलं आहे. यानंतर अशी अपेक्षा आहे की बादशाह सहदेवसह गाण्याचं शूट करेल.

एका मुलाखती दरम्यान सहदेवनं सांगितलं की त्याचे वडील शेतकरी आहेत आणि घरी टीव्ही, मोबाईल वगैरे नाही. तो नेहमीच दुसर्‍यांच्या फोनवरील गाणी ऐकतो आणि इतरांचे मोबाईल ऐकून शाळेत गायन करतो. इतकंच नाही तर त्या मुलाचं म्हणणं आहे की त्याला मोठं झाल्यावर गायक व्हायचं आहे.

संबंधित बातम्या

Raj Kundra Case : उमेश कामतच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट्समधून खुलासा, गेहना वसिष्ठचं फक्त ‘हॉटशॉट’च नाही तर ‘हॉटहिट’ मध्येही काम

Raj Kundra Case : उमेश कामतच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट्समधून खुलासा, गेहना वसिष्ठचं फक्त ‘हॉटशॉट’च नाही तर ‘हॉटहिट’ मध्येही काम

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें