AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | बॉसने फटकारलं म्हणून तरुणी चिडली, थेट आत्महत्या करण्याचा प्रयत्न, थरारक व्हिडीओ व्हायरल

सध्या बॉसच्या बोलण्याचा राग आल्यामुळे एका तरुणीची सोशल मीडियार चर्चा सुरु आहे. बॉसने दरडावल्यामुळे ही तरुणी थेट आत्महत्या करायला निघाली होती.

Video | बॉसने फटकारलं म्हणून तरुणी चिडली, थेट आत्महत्या करण्याचा प्रयत्न, थरारक व्हिडीओ व्हायरल
suicide viral video
| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 7:41 PM
Share

मुंबई : कामामध्ये काही कमतरता राहिली की नोकरदार वर्गाला त्यांच्या बॉसचे बोलणे हमखास खावे लागते. हे बोलणं ज्यांना एक धडा वाटतो, ते नंतर त्यांच्या करिअरमध्ये पुढे जातात. तर ज्या व्यक्तींना बॉसच्या बोलण्याचा राग येतो ते तिथेच थांबतात. सध्या बॉसच्या बोलण्याचा राग आलेल्या एका तरुणीची सोशल मीडियार जोरदार चर्चा सुरु आहे. बॉसने दरडावल्यामुळे ही तरुणी थेट आत्महत्या करायला निघाली होती. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (girl trying to commit suicide in faridabad sector 28 metro station video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

मिळालेल्या माहितीनुसार सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा फरिदाबाद येथील आहे. फरिदाबादमधील मेट्रो स्टेशनवर चढत 23 वर्षांच्या एका तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. फरिदाबाद येथील मेट्रो स्टेशन सेक्टर 28 मध्ये ही घटना घडली. ही तरुणी मेट्रो स्टेशनवरील एका गॅलरीमध्ये चढली. तसेच गॅलरीमध्ये चढून तिने थेट आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

CISF च्या जवानाने तरुणीला आत्महत्या करण्यापासून वाचवले

तरुणीला पाहून येथे लोकांनी चांगलीच गर्दी केली होती. खाली रस्त्यावर रहदारीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली होती. याच दरम्यान योग्य वेळ साधत  CISF चा जवान त्या तरुणीजवळ गेला. त्यानंतर  जवानाने तरुणीला पकडले आणि तिला आत्महत्या करण्यापासून रोखले.

बॉसने फटकारल्याचा तरुणीला राग

पोलिसांनी सांगितल्यानुसार आत्महत्येचा प्रयत्न करणारी तरुणी ही 23 वर्षांची असून ती दिल्लीमधील नांगलोई येथील रहिवासी आहे. ती फरिदाबाद येथील एका कंपनीमध्ये काम करते. दरम्यान, काम करताना या तरुणीला तिच्या बॉसने फटकारले. ज्यामुळे रागाच्या भरात ती सुसाईड करायला मेट्रो स्टेशनवर चढली होती.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. फरिदाबाद पोलिसांनीसुद्धा या व्हिडीओला त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर शेअर केलं आहे.

इतर बातम्या :

Video | विंकिंग गर्ल प्रिया वारियरच्या नव्या व्हिडीओची चर्चा, साडीमधील डान्स पाहून नेटकरी घायाळ

Video | गुलाबजाम घेऊन नवरदेव नवरीकडे आला, पण नथ आडवी आली, पुढे काय झालं ?

Bachpan Ka Pyaar : ‘बचपन का प्यार’ फेम सहदेवचं नशीब उघडलं, लवकरच झळकणार बादशाहच्या गाण्यात?

(girl trying to commit suicide in faridabad sector 28 metro station video went viral on social media)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.