Video | विंकिंग गर्ल प्रिया वारियरच्या नव्या व्हिडीओची चर्चा, साडीमधील डान्स पाहून नेटकरी घायाळ

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: prajwal dhage

Updated on: Jul 25, 2021 | 5:28 PM

तिच्या विकिंगच्या व्हिडीओनंतर प्रिया आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या एका नव्या व्हिडीओला पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.

Video | विंकिंग गर्ल प्रिया वारियरच्या नव्या व्हिडीओची चर्चा, साडीमधील डान्स पाहून नेटकरी घायाळ
PRIYA VARRIER

मुंबई : विंकिंग गर्ल म्हणून भारतभर प्रसिद्ध असलेली प्रिया प्रकाश वारियरचे लाखोंनी चाहते आहेत. विंक करुन एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या प्रियाने संपूर्ण देशाला वेड होते. तिच्या विकिंगच्या व्हिडीओनंतर प्रिया आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या एका नव्या व्हिडीओला पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. (winking girl Priya Varrier dancing on Russian road in Saree video went viral on social media)

प्रियाचा साडी घाललेला व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय

मिळालेल्या माहितीनुसार प्रिया काही दिवसांपूर्वी रशियामध्ये होती. रशियामध्ये ती तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत सुट्टीवर असल्यामुळे या काळात तिची धम्माल सुरु होती. रशियामध्ये असताना आपल्या फॅन्ससाठी ती तेथील फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत होती. याच व्हिडीओतील एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये प्रिया लाल रंगाचे स्लिव्हलेस ब्लाऊज आणि सुंदर अशा साडीमध्ये दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

साडीवर प्रियाचा भन्नाट डान्स

या साडीमध्ये प्रिया एका मल्याळम भाषेतील गितावर डान्स करत आहे. वेगवेगळे हावभाव करत तिने हा डान्स केला आहे. प्रियाचा साडीमधील डान्स नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 3 लाख 95 हजार लोकांनी लाईक केले आहे. तसेच तिच्या या व्हिडीओला पाहून तिच्या हजारो चाहत्यांनी कमेंट्स आहेत. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ अतिशय आवडला असून सोशल मीडियावर प्रियाच्या या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे.

इतर बातम्या :

Video | घनदाट जंगलातून वाहनांची ये-जा, मध्येच अस्वलं आलं, पुढे काय झालं ? एकदा पाहाच !

Video | ऑनलाईन क्लास बंद, शाळेत जावे लागणार म्हणून चिमुकलीचे नाटक, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

Video | इंदुरची बातच न्यारी, खाली आग वर तवा, ‘फायर डोशाची’ रेसिपी एकदा पाहाच !

(winking girl Priya Varrier dancing on Russian road in Saree video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI