Video | इंदुरची बातच न्यारी, खाली आग वर तवा, ‘फायर डोशाची’ रेसिपी एकदा पाहाच !

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हासुद्धा अशाच पद्धतीचा आहे. या व्हिडीओमध्ये अशाच एका खास फायर डोशाची माहिती देण्यात आली आहे.

Video | इंदुरची बातच न्यारी, खाली आग वर तवा, 'फायर डोशाची' रेसिपी एकदा पाहाच !
fire dosa viral video
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 4:02 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे मजेदार आणि थरारक असतात. तर काही व्हिडीओंच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली असते. काही व्हिडीओंमध्ये खवय्यांसाठी वेगवेगळ्या पदार्थांची माहिती देण्यात आलेली असते. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हासुद्धा अशाच पद्धतीचा आहे. या व्हिडीओमध्ये  खास अशा फायर डोशाची माहिती देण्यात आली आहे. (Indore fire dosa video went viral on social media)

फायर डोशाच्या मेकिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आपल्याला वेगवेगळे चविष्ट आणि रुचकर असे अन्नपदार्थ खायला आवडतात. अनेक भागातील प्रसिद्ध असलेल्या आणि चवीने खाल्ल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांची माहिती आपल्याला एका क्लिकवर सापडते. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दक्षिण भारतातील मुख्य खाद्यपदार्थ असलेला आणि संपूर्ण भारतात पसंदी मिळालेल्या डोशाबद्दल माहिती देण्यात आली आहे. व्हिडीओत दाखवण्यात आलेला डोसा हा काही साधारण डोसा नाही. तर या डोशाचे नाव फायर डोसा असून त्याची तयार करण्याची पद्धत आणि चव सर्वांपेक्षा वेगळी आहे. याच कारणामुळे या फायर डोशाच्या मेकिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये फायर डोसा कसा बनवला जातो, याबद्दल सांगण्यात आले आहे. या व्हिडीओमधील शेफने चुलीवर एक तवा ठेवला आहे. या तव्यावर त्याने डोसा तयार करण्यासाठी लागणारा मसाला टाकला आहे. त्यामध्ये त्याने मसाले, भाज्या, चीज आणि सॉस टाकला आहे. तसेच इतर लागणारे साहित्यसुद्धा त्या शेफने तव्यावर टाकले आहेत.

टेबल फॅनच्या मदतीने शेफने आगीवर डोसा भाजला

डोशासाठी लागणारे सर्व पदार्थ तव्यावर टाकल्यानंतर हा शेफ त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करतो आहे. शेवटी डोसा तयार झाल्यानंतर त्याने त्याचे तुकडे केले आहेत. तसेच टेबल फॅनच्या मदतीने शेफने आगीवर डोसा भाजला आहे. आगीच्या मदतीने शेफने तयार केलेला हा डोसा सर्वांनाच आवडला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियाव व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर तो चर्चेचा विषय ठरला आहे. नेटकरी या फायर डोशाची रेसिपी पाहून आनंदीत झाले असून एकदातरी त्याची चव चाखायला हवीच असे म्हणत आहेत. हा व्हिडीओ ट्विटर तसेच फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय .

इतर बातम्या :

VIDEO | नाशकात फ्री स्टाईल हाणामारी, सोसायटी अध्यक्ष-सचिवांनी महिलेला मारहाण केल्याचा आरोप

Video | फोटोंसाठी काहीही! लग्नाचे ‘परफेक्ट क्षण’ टिपण्यासाठी फोटोग्राफारची अनोखी कसरत, पाहणारे म्हणाले ‘हाच तो फोटोग्राफर ऑफ दी इयर’!

इमारतीत मगर पाहून घाबरली महिला, पोलिस आल्यानंतर सत्य आलं समोर, काय आहे नेमकं प्रकरण?

(Indore fire dosa video went viral on social media)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.