इमारतीत मगर पाहून घाबरली महिला, पोलिस आल्यानंतर सत्य आलं समोर, काय आहे नेमकं प्रकरण?

युकेमध्ये एका महिलेला इमारतीत शिरताच शिड्यांखाली मगर लपलेली दिसली. मग काय मगरीला पाहताच महिलेचे धाबे दणाणले तिने पहिला पोलिसांना फोन लावला. पोलिसही सर्व प्रकार पाहून चकित झाले.

इमारतीत मगर पाहून घाबरली महिला, पोलिस आल्यानंतर सत्य आलं समोर, काय आहे नेमकं प्रकरण?
हाच तो मगरीचा पुतळा

लंडन : विचार करा तुम्ही सहज फेरफटका मारायला निघालात आणि तुमच्या इमारतीत तुम्हाला अचानक एक महाकाय मगर  (Crocodile) दिसली तर काय होईल? नक्कीच तुम्ही खूप घाबराल. स्थानिक ठिकाणी अचानक मगरीसारखा प्राणी दिसल्यावर कोणीही घाबरले. अशीच काहीशी घटना यूनाइटेड किंग्डमच्या (United Kingdom) एका इमारतीत घडली. तेथील एक महिला अचानक इमारतीत मगर पाहून इतकी घाबरली की तिने पहिला पोलिसांना फोन केला.

तर नेमकं प्रकरण असं आहे की, ब्रिटिश कोलंबियामध्ये पोलिसांना एका इमारतीच्या आत मगर असल्याचा कॉल आला. पण पोलिसांनी इमारतीत पोहोचताच जे पाहिलं ते पाहून सर्वचजण चकीत झाले. मूळात ती मगर खरी नसून मगरीचा पुतळा होता. या मजेशीर घटनेबाबत तेथील पोलिस विभागातील ऑफिसर Jason Doucette यांनी ट्विटरवर एक ट्विट केलं. त्यांनी लिहिलं, ‘आमच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी सकाळी 7 च्या सुमारास एका इमारतीत मगर आल्याचा कॉल आला होता. त्याठिकाणी एका महिलेला इमारतींच्या शिड्यांखाली मगर लपल्याचे दिसले होते. पण अधिकारी तिथे पोहोचले असता ती मगर नसून एक गोल्डन कलरचा मगरीचा पुतळा होता.’

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

पोलिस देखील मगर असल्याची माहिती मिळताच मगर पकडण्यासाठी संपूर्ण तयारीने त्याठिकाणी पोहोचले होते. पण तिथे खरी मगर नसून मगरीचा पुतळा असल्याने पोलिसांनाही हसू अनावर झाले. पण या खोट्या मगरीने संबधित महिलेला खरे खुरे घाबरवले. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही या पोस्टवर खूप हसत आहेत.

हे ही वाचा : 

VIRAL VIDEO | लग्नाच्या वाढदिवशी नवऱ्याकडून एक किलो सोन्याचा हार भेट? व्हायरल व्हिडीओमागील सत्य

Viral Video: लहान मुलांच्या सायकलवर बसला, वजनाचा भार इतका की… पाहा पुढे काय घडलं…

Video | कसलीही चिंता न करता कारमध्ये ठाण मांडले, डेअरिंगबाज अस्वलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

(In UK woman panicked after seeing Crocodile in building Police found its just a statue)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI