Viral Video: लहान मुलांच्या सायकलवर बसला, वजनाचा भार इतका की… पाहा पुढे काय घडलं…

इन्स्टंट रिग्रेट नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा गमतीदार व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. (Viral Video: Boy Sitting on a child's bicycle see what happened next ...)

Viral Video: लहान मुलांच्या सायकलवर बसला, वजनाचा भार इतका की... पाहा पुढे काय घडलं...

मुंबई : अनेकदा लहान मुलांना खेळताना पाहिलं की आपणही खेळावं बाळगावं असं मोठ्यांना वाटत असतं. अनेक जण आपल्यातील हे लहान मुलं नेहमी जपून ठेवतं. असेही अनेक लोक आहेत ज्यांचं बालपण मोठं झाल्यानंतरही संपत नाही. मुलं खेळताना दिसली की तेही खेळायला लागतात. कधीकधी ज्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो. असाच एक व्हिडीओ (Viral Video) सध्या समोर आला आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल होतोय. ज्यामध्ये एका मोठ्या मुलानं एका लहान मुलाची सायकल चालवण्याची चूक केली, या मोठ्या मुलानं ही सायकल चालवण्याचा प्रयत्न करताच, असं काहीतरी घडलं की तुम्हीही पाहून आश्चर्यचकित व्हाल.

पाहा व्हिडीओ

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की मोठा मुलगा घराबाहेर या लहान मुलाची सायकल चालवण्याचा प्रयत्न करत आहे. सायकल असलेल्या मुलाच्या जवळच एक लहान मूल उभं आहे. सायकल चालवण्यासाठी तो मोठा मुलगा सायकलवर चढताच. तो चाक पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि सायकल त्याचं वजन सहन करण्यास असमर्थ ठरते. तेवढ्यात सायकल ब्रेक होते आणि हा मुलगा जमिनीवर पडतो.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. लोक हा खूप पसंत करत आहेत. यामुळे अनेक नेटकऱ्यांनी व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकानं लिहिलं की, ‘भाऊ, तुझं शरीर पाहून तू सायकलवर बसलं पाहिजे.’ दुसरीकडे, दुसर्‍याने लिहिले की, ‘त्याच्या जिद्दीमुळे त्यानं मुलाची सायकल मोडली.’ या व्यतिरिक्त अन्य बर्‍याच लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे या व्हिडीओवर भाष्य केलं आहे.

इन्स्टंट रिग्रेट नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा गमतीदार व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. शिवाय या व्हिडीओला ही बातमी लिहिली गेली तोपर्यंत 15 हजाराहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. यासह साडेपाचशेहून अधिक शेअर आणि शंभरहून अधिक रिट्वीट प्राप्त झाले आहेत.

संबंधित बातम्या

Video | कसलीही चिंता न करता कारमध्ये ठाण मांडले, डेअरिंगबाज अस्वलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video | डिजेचा आवाज ऐकताच झोपडीवर चढला, केला मजेदार डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच

बाईक चालवताना अडचण, मग काय बाईक खांद्यावर उचलून केला रस्ता पार, पाहा देसी बाहुबलीचा भन्नाट VIDEO

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI