Video | चिमुकल्याचा डान्स म्हणजे निखळ आनंद, व्हिडीओ एकदा पाहाच !

सध्या एका चिमुकल्याचा असाच एक मजेदार आणि मूड फ्रेश करणारा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video | चिमुकल्याचा डान्स म्हणजे निखळ आनंद, व्हिडीओ एकदा पाहाच !
boy-dance-video

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. वेगवेगळ्या डान्सचे तर अनेक व्हिडीओ या मंचावर शेअर केले जातात. सध्या एका चिमुकल्याचा असाच एक मजेदार आणि मूड फ्रेश करणारा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (small boy energetic dance went viral on social media)

चिमुकल्याने केलेले हावभाव नेटकऱ्यांना भावले

आपल्या देशात टॅलेन्टची कमी नाही. कोणत्या व्यक्तीमध्ये काय कला असेल हे सांगता येत नाही. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये तर असे वेगवेगळे हुनरबाज लोक आपल्याला नेहमीच दिसतात. मात्र, सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा काही एखाद्या माणसाचा नाही. तर हा व्हिडीओ एका छोट्या मुलाचा आहे. त्याने केलेला डान्स सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. डान्सदरम्यान या चिमुकल्याने केलेले हावभाव आणि डान्स करतानाची त्याची तन्मयता नेटकऱ्यांना चांगलीच भावली आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ आपला मू़ड फ्रेश करणारा आहे. या व्हिडीओमध्ये एक अगदीच छोटा मुलगा मजेदार डान्स करतो आहे. एक हात वर करुन तो आकर्षक पद्धतीने डान्स करतोय. डोळे लावून तालावर ठेका धरण्याची या लहान मुलाची पद्धत नेटकऱ्यांना आवडली आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ पाहून नेटकरी खुश झाले असून त्यावर मजेदार असा प्रतिक्रिया देत आहेत. तसेच या व्हिडीओला सध्या फेसबुक, ट्विटर तसेच इन्स्टाग्रामवर उत्स्फूर्तपणे शेअर केले जात आहे.

इतर बातम्या :

Video | नदी पार करण्यासाठी लढवली शक्कल, देशी जुगाड एकदा पाहाच !

Video | कसलीही चिंता न करता कारमध्ये ठाण मांडले, डेअरिंगबाज अस्वलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video | डिजेचा आवाज ऐकताच झोपडीवर चढला, केला मजेदार डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच

(small boy energetic dance went viral on social media)