Video | डिजेचा आवाज ऐकताच झोपडीवर चढला, केला मजेदार डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या असाच एका डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक माणूस चक्क झोपडीवर जाऊन ठुमके मारतोय.

Video | डिजेचा आवाज ऐकताच झोपडीवर चढला, केला मजेदार डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच
amazing-dance-video

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील डान्सचे व्हिडीओ तर नेटकऱ्यांना जास्तच आवडतात. तरुण आणि तरुणींचे डान्स विशेषत्वाने लोकांना आवडतात. सध्या असाच एका डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक माणूस चक्क झोपडीवर जाऊन ठुमके मारतोय. (man funny dance video went viral on social media)

झोपडीवर चढून माणसाचा डान्स 

सोशल मीडिया हे माध्यम हे मोठं व्यापक आहे. या मंचावर रोज विविध व्हिडीओ अपलोड केले जातात. प्राणी, पक्षांचे तसेच काही थरारक आणि मजेदार व्हिडीओ या माध्यमावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एका माणसाचा अगदीच खरमरीत असा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा माणसू थेट झोपडीवर जाऊन थिरकतो आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये डिजेवर एक गाणे वाजत आहे. डिजेवरील गाणे ऐकूण या माणसाला स्वत:च्या भावना आवरलेल्या नाहीत. हा माणूस थेट झोपडीवर चढला आहे. झोपडीवर चढून कशाचीही पर्वा न करता त्याने ठेका धरला आहे. त्याचा हा झोपडी डान्स पाहून बाजूच्या लोकांना हसू आवरेलेले नाही. हा माणूस डान्स करतानाचा प्रसंग कॅमेऱ्यात कैद केला आहे.

खाली उतरण्यासाठी माणसांची विनंती

झोपडीवर डान्स करत असल्यामुळे तो खाली कोसळण्याची भीती वाटत आहे. याच भीतीपोटी काही लोक त्याला खाली उतरायला सांगत आहेत. मात्र, तो कोणालाही दाद न देता आपल्याच धुंदीत डान्स करतोय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

माणसाच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हयरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत. तसेच या व्हिडीओला ट्विटर, फेसबुक तसेच इन्स्टाग्राम अशा विविध माध्यमांवर शेअर करत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला फेसूकवरच्या Jaat Entertainment या पेजवर अपलोड करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | नवरीला पाहून नवरदेवाने धरला ठेका, डान्स करताच टाळ्या, शिट्ट्यांचा पाऊस

VIDEO : ईदनिमित्ताने पाकिस्तानी पत्रकाराने घेतली चक्क म्हशीची मुलाखत, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल!

Video | गाण्याच्या तालावर हावभाव अन् ठुमके, काकांच्या डान्समुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

(man funny dance video went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI