AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | गाण्याच्या तालावर हावभाव अन् ठुमके, काकांच्या डान्समुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

हा व्हिडीओ आपल्याला पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या ताकदीची आणि लोकप्रियतेची प्रचिती करुन देतोय. या व्हिडीओमध्ये काकांनी केलेला डान्स एखाद्या तरुण डान्सर मुलीलाही लाजवेल असाच आहे.

Video | गाण्याच्या तालावर हावभाव अन् ठुमके, काकांच्या डान्समुळे सोशल मीडियावर धुमाकूळ
kaka viral dance video
| Edited By: | Updated on: Jul 22, 2021 | 1:47 AM
Share

मुंबई : सोशल मीडियाचं विश्च अगदीच मजेदार आहे. या माध्यमात एक वेगळीच ताकद असल्यामुळे लहान मुलांपासून ते तरुण आणि वृद्धसुद्धा यावर सक्रिय असतात. आपल्या भोवाताली असणारे काही काका किंवा काकूसुद्धा यामध्ये मागे नाहीत. सध्या अशाच एका काकांचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ आपल्याला पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या ताकदीची आणि लोकप्रियतेची प्रचिती करुन देतोय. या व्हिडीओमध्ये काकांनी केलेला डान्स एखाद्या तरुण डान्सर मुलीलाही लाजवेल असाच आहे. (old man dancing energetically on hindi song video went viral on social media)

काकांचे गाण्याच्या तालावर मजेदार हावभाव

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक काका दिसत आहेत. हे काका एका हिंदी गाण्यावर थिरकताना दिसतायत. ‘सजना तेरे प्यार में हम परदेशी हो गये रे’ या हिंदी गाण्यावर या काकांनी ठेका धरला आहे. काकांनी या गाण्याच्या तालावर मजेदार हावभाव केले आहेत. तसेच मनमोहक हातवारे केल्यामुळे काकांच्या डान्समध्ये जिवंतपणा आला आहे. एखाद्या तरुण आणि तरबेज डान्सरलाही लाजवेल असा डान्स या काकांनी केला आहे.

काकांचा डान्स मजेदार आणि स्मरणात राहणारा

या व्हिडीओमध्ये गाण्याच्या तालावर काकांनी कंबर हालवली आहे. त्याच्या या धडाकेबाज गाण्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून अतिशय आनंदी झाले आहेत. यापूर्वीसुद्धा सोशल मीडियावर डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालले आहेत. मात्र काकांचा हा व्हिडीओ काहीसा वेगळा आणि स्मरणात राहणारा असल्याचे म्हटले जात आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला kk2_carzy_army या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत तीन लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

इतर बातम्या :

बाईक चालवताना अडचण, मग काय बाईक खांद्यावर उचलून केला रस्ता पार, पाहा देसी बाहुबलीचा भन्नाट VIDEO

Video | अन्ना दुराईंच्या रिक्षात आयपॅडसह टीव्ही, पेपर, मासिके, स्नॅक्स अन् बरंच काही, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | खारुताई-मांजरीमध्ये जबरदस्त मारामारी, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच !

(old man dancing energetically on hindi song video went viral on social media)

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.