Video | नवरीला पाहून नवरदेवाने धरला ठेका, डान्स करताच टाळ्या, शिट्ट्यांचा पाऊस

या व्हिडीओमध्ये नवरी आणि नवरदेव अगदीच मनमोहक आणि सर्वांना आवडेल असा डान्स करत आहेत. त्यांच्या डान्सची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

Video | नवरीला पाहून नवरदेवाने धरला ठेका, डान्स करताच टाळ्या, शिट्ट्यांचा पाऊस
BRIDE AND GROOM VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण आश्चर्यचकित होऊन जातो. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा एका लग्न समारंभातील आहे. या व्हिडीओमध्ये नवरी आणि नवरदेव अगदीच मनमोहक आणि सर्वांना आवडेल असा डान्स करत आहेत. त्यांच्या डान्सची सध्या सगळीकडे चर्चा आहे. (bride and groom dance video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा अतिशय मजेदार आहे. लग्नसमारंभातील असल्यामुळे हा व्हिडीओ लोकांना जास्तच आवडतो आहे. या व्हिडीओमध्ये नवरी आणि नवरदेव एकमेकांना साथ देत डान्स करत आहेत. ‘तुझको ही दुल्हन बनाऊंगा’ या गाण्यावर दोघेही थिरकताना दिसत आहेत. दोघांचाही हा डान्स नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नवरीला समोर बघून नवरदेवाला चांगलाच आनंद झाला आहे. थोड्या वेळानंतर हिंदी चित्रपटातील गीत लागल्यानंतर तो नवरीकडे बघत बघत तसेच नवरीला हातवारे करत डान्स करतोय. आपला होणारा नवरा डान्स करत असल्याचे पाहून नवरीसुद्धा खुलली आहे. नवरदेवाने डान्स केल्यानंतर नवरीसुद्धा कंबर हालवत ठुमके मारत आहेत. दोघांचा हा डान्स पाहून लग्न समारंभात आलेले पाहुणे टाळ्या तसेच शिट्ट्या वाजवत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर तो चांगलाच व्हायरल झाला असून नेटकरी त्यावर मजेदार कमेंट्स करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, त्याला @kumarayush या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

VIDEO : ईदनिमित्ताने पाकिस्तानी पत्रकाराने घेतली चक्क म्हशीची मुलाखत, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल!

बाईक चालवताना अडचण, मग काय बाईक खांद्यावर उचलून केला रस्ता पार, पाहा देसी बाहुबलीचा भन्नाट VIDEO

Video | अन्ना दुराईंच्या रिक्षात आयपॅडसह टीव्ही, पेपर, मासिके, स्नॅक्स अन् बरंच काही, व्हिडीओ एकदा पाहाच

(bride and groom dance video went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI