VIDEO : ईदनिमित्ताने पाकिस्तानी पत्रकाराने घेतली चक्क म्हशीची मुलाखत, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल!

आजकाल सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. त्यामध्ये सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये एक पाकिस्तानी पत्रकार चक्क म्हशीची मुलाखत घेत आहे.

VIDEO : ईदनिमित्ताने पाकिस्तानी पत्रकाराने घेतली चक्क म्हशीची मुलाखत, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल!
म्हशीची मुलाखत

मुंबई : आजकाल सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. त्यामध्ये सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक पाकिस्तानी पत्रकार चक्क म्हशीची मुलाखत घेत आहे. जगभरातील पत्रकार त्यांच्या बातम्यांमुळे आणि लिखाणामुळे ओळखले जातात. मात्र, प्रसिद्ध पाकिस्तानी पत्रकार अमीन हफीज प्राण्यांच्या मुलाखतीमुळे नेहमीच चर्चेत राहतात. (On this occasion a Pakistani journalist interviewed a buffalo Watch Video)

पाकिस्तानी पत्रकार अमीन हफीजचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर, काही दिवसांपूर्वी हफीज यांनीच एका गाढवाची मुलाखत घेतली होती. आता ईदनिमित्त हफीजने एका म्हशीची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचे खास वैशिष्ट म्हणजे पत्रकार हफीजच्या प्रश्नांना चक्क म्हशीने पण उत्तरे दिली आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. नायला इनायतने ही व्हिडिओची क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे.

इथे बघा व्हिडीओ –

 

या व्हिडिओत, पत्रकार हाफीज म्हशीसमोर माइक घेऊन विचारतो आहे की, तुला लाहोरला येताना कसे वाटले. हाफीजच्या या प्रश्नाचे उत्तरही या म्हशीने दिले आहे. हे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हाफीज म्हशीला दुसरा एक प्रश्न विचारतो की, लाहोरचे खाणे चांगले आहे की, तुमच्या गावाकडचे…या प्रश्नालाही म्हशीने उत्तर दिले आहे. आपल्या प्रश्नाला म्हैस उत्तर देत आहे. हे बघून हाफीज अतिशय आनंदी झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण पोट धरून जोर-जोरात हसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका वापरकर्त्याने म्हटले की, पाकिस्तान खरोखर एक आश्चर्यकारक स्थान आहे, येथे काहीही घडू शकते. आतापर्यंत 8 हजाराहून अधिक लोकांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिला आहे, तर मोठ्या संख्येने लोक हा व्हिडीओ शेअर देखील करत आहेत. यासह लोक जबरदस्त कमेंट करून पत्रकार हाफिजला ट्रोल देखील करत आहेत. एका वापरकर्त्याने ट्वीट करून लिहिले की, ‘हाच तो एक व्यक्ती आहे ज्याने प्राण्यांच्या मुलाखती घेण्यात प्रभुत्व मिळवले आहे’

संबंधित बातम्या : 

Video | गाण्याच्या तालावर हावभाव अन् ठुमके, काकांच्या डान्समुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

Video | अन्ना दुराईंच्या रिक्षात आयपॅडसह टीव्ही, पेपर, मासिके, स्नॅक्स अन् बरंच काही, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | खारुताई-मांजरीमध्ये जबरदस्त मारामारी, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच !

(On this occasion a Pakistani journalist interviewed a buffalo Watch Video)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI