AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | फोटोंसाठी काहीही! लग्नाचे ‘परफेक्ट क्षण’ टिपण्यासाठी फोटोग्राफारची अनोखी कसरत, पाहणारे म्हणाले ‘हाच तो फोटोग्राफर ऑफ दी इयर’!

सोशल मीडियावर लग्नाचे एकापेक्षा एक व्हिडीओ शेअर केले जातात. यातील काही व्हिडीओ खूप मजेदार असतात, जे पाहून लोक पोट धरून हसतात. त्याच वेळी, असे काही व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित देखील होतात.

Video | फोटोंसाठी काहीही! लग्नाचे ‘परफेक्ट क्षण’ टिपण्यासाठी फोटोग्राफारची अनोखी कसरत, पाहणारे म्हणाले ‘हाच तो फोटोग्राफर ऑफ दी इयर’!
Funny Wedding Video
| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 12:04 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर लग्नाचे एकापेक्षा एक व्हिडीओ शेअर केले जातात. यातील काही व्हिडीओ खूप मजेदार असतात, जे पाहून लोक पोट धरून हसतात. त्याच वेळी, असे काही व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित देखील होतात. बरेच व्हिडीओ इतके मजेदार असतात की, अशा व्हिडीओंवर कोट्यावधी व्हूव्ज मिळतात आणि वापरकर्त्यांनी बऱ्याच कमेंट देखील केलेल्या असतात. सध्या असाच लग्नाचा आणखी एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला गेला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही खूप हसू येईल.

आपल्या सर्वांना माहित आहे की, बर्‍याच कुटुंबांमध्ये वधू-वर यांच्या वतीने छायाचित्रकारांची स्वतंत्र टीम नियुक्त केली जाते. लग्नाचा कोणताही खास क्षण लोकांना गमावायचा नसतो. अलीकडच्या काळात अशा एका कॅमेरामनचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून आपण देखील छायाचित्रकाराच्या कौशल्याची स्तुती करण्यास कंटाळा करणार नाही.

पाहा हा व्हिडीओ

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, वधू-वर सात फेरे घेत आहेत आणि त्यांच्या समोर मास्क घातलेले दोन लोक गाडीवर कॅमेरा पडकून फोटो काढत असलेल्या माणसाला ओढत आहेत. वधू आणि वर यांच्या परफेक्ट फोटो शॉटसाठी कॅमेरामन ही कसरत करत आहे. फोटोग्राफरने आणि त्याच्या टीमने अशी आशा केली असावी की, या प्रकारे फेरे घेणाऱ्या वधू-वरांचे अधिक चांगले फोटो आपल्याला मिळतील.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खिप्च चर्चेत आला असून, लोक खूप पसंत करत आहेत. यामुळेच अनेक वापरकर्त्यांनी व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. या छायाचित्रकाराला ‘फोटोग्राफर ऑफ द इयर’ पुरस्कार देण्यात यावा, असे एका वापरकर्त्याने म्हटले आहे. दुसरीकडे, दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की, यावर्षी मी पाहिलेली ही सर्वात मजेशीर गोष्ट आहे. या व्यतिरिक्त इतर बर्‍याच वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे या छायाचित्रकाराचे कौतुक केले आहे.

(The photographer’s unique exercise to capture the ‘perfect moment’, viewers said ‘this is the Photographer of the Year’)

हेही वाचा :

इमारतीत मगर पाहून घाबरली महिला, पोलिस आल्यानंतर सत्य आलं समोर, काय आहे नेमकं प्रकरण?

Viral Video : नवऱ्यानं शूट केला मजेदार व्हिडीओ, बायकोची रिअ‍ॅक्शन बघून नेटकऱ्यांनाही आलं हसू

नोकरीच्या शोधात जोडपं निघालं आणि आख्ख गाव वसवलं, ‘इथं’ एकाच वंशाचे 800 लोक राहतात

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.