नोकरीच्या शोधात जोडपं निघालं आणि आख्ख गाव वसवलं, ‘इथं’ एकाच वंशाचे 800 लोक राहतात

कामाच्या शोधात स्थलांतर अनेक वर्षांपासून होतंय. मात्र, नोकरीच्या शोधात निघाले आणि जंगलात स्थायिक होऊन तिथंच 800 लोकांचं आख्ख गाव वसवल्याचं तुम्ही कधी ऐकलंय?

नोकरीच्या शोधात जोडपं निघालं आणि आख्ख गाव वसवलं, 'इथं' एकाच वंशाचे 800 लोक राहतात


रांची : कामाच्या शोधात स्थलांतर अनेक वर्षांपासून होतंय. मात्र, नोकरीच्या शोधात निघाले आणि जंगलात स्थायिक होऊन तिथंच 800 लोकांचं आख्ख गाव वसवल्याचं तुम्ही कधी ऐकलंय. नसेल तर आज त्या जोडप्याविषयीच जाणून घेणार आहोत. देशात एकीकडे लोकसंख्या नियंत्रणाची चर्चा असताना झारखंडमधील कोडरमा जिल्ह्यातील एक गाव चांगलंच चर्चेत आहे. या गावाचं नाव आहे नादकरी उपरी टोला. या गावाची गोष्ट अगदीच मजेशीर आहे.

उत्तमी मिया नावाची एक व्यक्ती 1905 मध्ये कामधंद्यासाठी आपली पत्नी आणि वडिलांसह निघाले. काही प्रवास केल्यानंतर त्यांनी एका ठिकाणी जंगलात थांबण्याचा निर्णय घेतला. हे ठिकाण म्हणजे कोडरमा. येथे त्यांनी आपल्या कुटुंबाच्या मदतीने जंगल साफ करत शेतीयोग्य जमीन तयार केली. तिथंच एक झोपडी तयार केली. त्यानंतर वर्षा मागून वर्ष उत्तमी मिया यांचं कुटुंब वाढत गेलं. आधी 2 चे 5 झाले, 5 वरुन कुटुंबातील सदस्य संख्या 82 वर पोहचली आणि आज 116 वर्षांनी त्यांच्या वंशाची संख्या 800 झालीय. ते एकाच गावात राहतात.

5 मुलांपासून 800 जणांचं कुटुंब

उत्तमी मिया यांच्या पहिल्या 5 मुलांची नावं मोहम्मद मिया, इब्राहिम मिया, हनीफ अंसारी, करीम बख्श आणि सदीक मिया अशी होती. त्यांच्यापासून ही संख्या 26 मुलं आणि 13 मुली इथपर्यंत गेली. पुढे ही कुटुंब संख्या वाढत जाऊन आज एकाच गावात 800 एकाच वंशाचे लोक राहतात. आधी चुलत भाऊ बहिणींमध्येच लग्न व्हायचं.

आता बाहेर गावातही लग्न होतात. या गावातील 800 पैकी 400 जणांची नावं मतदार यादीत आहेत. या गावाचा मूळ व्यवसाय शेतीच आहे. काही लोकांनी कामाच्या शोधात कर काहींनी सरकारी नोकरीसाठी गाव सोडलं. त्यानंतर गावची लोकसंख्या 800 आहे. या गावात दोन मशीद, मदरसा, शाळा आहेत.

हेही वाचा :

VIDEO : ‘घूमर’वर छोट्या मुलीने आईसोबत धरला ठेका, व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही नाचू लागाल

Viral Video: लहान मुलांच्या सायकलवर बसला, वजनाचा भार इतका की… पाहा पुढे काय घडलं…

Video | नदी पार करण्यासाठी लढवली शक्कल, देशी जुगाड एकदा पाहाच !

व्हिडीओ पाहा :

Couple made Family of 800 people while in search of job in Jharkhand

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI