VIDEO : ‘घूमर’वर छोट्या मुलीने आईसोबत धरला ठेका, व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही नाचू लागाल

सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ शेअर होत असतात आणि धूमाकूळ घालतात. सामान्य लोकांपासून सेलिब्रेटींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियावर सक्रिय असतात.

VIDEO : 'घूमर'वर छोट्या मुलीने आईसोबत धरला ठेका, व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही नाचू लागाल
डान्स व्हिडीओ व्हायरल

मुंबई : सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ शेअर होत असतात आणि धुमाकूळ घालतात. सामान्य लोकांपासून सेलिब्रेटींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियावर सक्रिय असतात. लहान मुलांचे खूप गमतीदार व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. विशेष म्हणजे लहान मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ देखील घालतात. (Mother and daughter dance video on ghoomar song goes viral on social media)

लहान मुलांचे व्हिडीओ एकदा बघून आपले मन भरणार नाही. ज्यामुळे लोक हे व्हिडिओ त्यांच्या फोन किंवा लॅपटॉपमध्ये सेव्ह करतात. अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये एक छोटी मुलगी आपल्या आईसोबत दीपिका पादुकोणच्या लोकप्रिय घूमर या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की दीपिका पादुकोणच्या 2018 च्या पद्मावत या चित्रपटाचे गाणे घुमरवर नाचताना आई आणि मुलगी दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tania & Sony (@tania_and_sony)

यासाठी दोघांनी मॅचिंग आउटफिट्स घातलेले आहेत.  लोकांना हा आई आणि मुलीच्या डान्सचा व्हिडीओ प्रचंड आवडलेला दिसत आहे. या व्हिडीओवर एका वापरकर्त्याने लिहिले आहे की “ती लहान मुलगी खूप छान डान्स करत आहे.” दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की “सुंदर, आई-मुलीच्या जोडीचे असे सुंदर नृत्य”, अप्रतिम !.

या व्यतिरिक्त इतर बर्‍याच वापरकर्त्यांनी या व्हिडिओचे वेगवेगळ्या प्रकारे कौतुक केले. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर tania_and_sony या नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे. आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ आपल्या पेजवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातल आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत, या मायलेकीचे काैतुकही केले आहे.

संबंधित बातम्या : 

VIRAL VIDEO | लग्नाच्या वाढदिवशी नवऱ्याकडून एक किलो सोन्याचा हार भेट? व्हायरल व्हिडीओमागील सत्य

Viral Video: लहान मुलांच्या सायकलवर बसला, वजनाचा भार इतका की… पाहा पुढे काय घडलं…

Video | कसलीही चिंता न करता कारमध्ये ठाण मांडले, डेअरिंगबाज अस्वलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

(Mother and daughter dance video on ghoomar song goes viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI