Video | पाखरालाही आत येण्यास परवानगी नसलेल्या संसदेत उंदराचा धुडगूस, स्पेनच्या खासदारांची तारांबळ

अँड्याल्यूशिया (Andalusia, स्पेन) च्या संसदेत एका उंदराने धुडगूस घातला आहे. या उंदराच्या करामतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Video | पाखरालाही आत येण्यास परवानगी नसलेल्या संसदेत उंदराचा धुडगूस, स्पेनच्या खासदारांची तारांबळ
MOUSE VIRAL VIDEO

मुंबई : उंदीर दिसायला अगदीच लहान असतो. म्हटलं तर त्याला संपवायला एक मिनीटही लागत नाही. मात्र, हाच उंदीर कधीकधी आपल्या नाकी नऊ आणतो. उंदराचे उपद्रव तर सगळ्यांनाच माहिती आहेत. त्याला पाहून महिला चांगल्याच घाबतात. याच उंदराची चर्चा एका वेगळ्या कारणामुळे सुरु आहे. अँड्याल्यूशिया (Andalusia, स्पेन) च्या संसदेत एका उंदराने धुडगूस घातला आहे. या उंदराच्या करामतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (rat enters into spain parliament video went viral on social media)

समोर उंदीर पाहून महिला खासदार चांगलीच गोंधळली

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा अँड्याल्यूशियाच्या (स्पेन) संसदेतील आहे. या संसदेमध्ये खासदारांची एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरु होती. मात्र याचवेळी एका महिला खासदाराला उंदीर दिसला. समोर उंदीर पाहून ही महिला खासदार चांगलीच गोंधळली. उंदराला पाहून ती ओरडायला लागली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

उंदरापासून संरक्षण करण्यासाठी खुर्ची आणि टेबलवर बसले

या व्हिडीओमध्ये महिला ओरडल्यामुळे संसदेत बसलेले बाकीचे खासदारसुद्धा घाबरल्याचे आपल्याला दिसतेय. तसेच संसदेच्या परिसरात उंदीर शिरल्याचे ऐकून ते इकडे-तिकडे पळत सुटले आहेत. काही खासदार तर उंदरापासून संरक्षण होण्यासाठी खुर्ची आणि टेबलवर बसले आहेत. ज्या ठिकाणी पक्षीसुद्धा सहजासहजी प्रवेश करु शकत नाही, अशा संसदेत एका उंदराने घातलेला घुडगूस सध्या चर्चेचा विषय ठऱतो आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर काही क्षणांत चर्चेत आला आहे. लोक या व्हिडीओला पाहून मजेदार कमेंट्स करत आहेत. तसेच हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करत आहेत. हा व्हिडीओ रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

इतर बातम्या :

Video | डिजेचा आवाज ऐकताच झोपडीवर चढला, केला मजेदार डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | नवरीला पाहून नवरदेवाने धरला ठेका, डान्स करताच टाळ्या, शिट्ट्यांचा पाऊस

VIDEO : ईदनिमित्ताने पाकिस्तानी पत्रकाराने घेतली चक्क म्हशीची मुलाखत, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

(rat enters into spain parliament video went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI