Viral Video : नवऱ्यानं शूट केला मजेदार व्हिडीओ, बायकोची रिअ‍ॅक्शन बघून नेटकऱ्यांनाही आलं हसू

सध्या नवरा-बायकोचा एक मस्त व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडीओ कोट्यावधी वेळा पाहिला गेला आहे. (Viral Video: Husband shoots funny video, netizens laughed after watching wife's reaction)

Viral Video : नवऱ्यानं शूट केला मजेदार व्हिडीओ, बायकोची रिअ‍ॅक्शन बघून नेटकऱ्यांनाही आलं हसू


मुंबई : सध्या सोशल मीडियावर (Social Media) अनेक मजेदार व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Viral Videos) होत असतात. एवढंच नाही तर हे व्हिडीओ अनेक लोकांच्या पसंतीस उतरत असतात. अनेकदा हे व्हिडीओ आपल्याला आश्चर्यचकित करणारे ठरतात, तर हे व्हिडीओ पाहिल्यावर प्रचंड हसायला येतं, तर नुकतंच असाच एक व्हिडीओ चर्चेचा विषय झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचा दिवस नक्कीच उत्तम आणि मजेदार होणार आहे.

आपल्या सर्वांना हे माहित आहे की सोशल मीडियावर नेटकऱ्यांना पती-पत्नीनी बनवलेले किंवा कपलनं बनवलेले मजेदार व्हिडीओ आवडतात. तर सध्या नवरा-बायकोचा एक मस्त व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडीओ कोट्यावधी वेळा पाहिला गेला आहे.

पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की पत्नी झोपलेली आहे, तेव्हाच तिचा नवरा शांतपणे तिच्या जवळ येतो आणि तिचे केस 5 भागामध्ये विभाजित करतो आणि त्यापासून 5 वेण्या बनवतो. यानंतर, तो आपल्या बायकोला ‘बेड टी’ देतो आणि नंतर तिच्या प्रतिक्रियेची वाट पाहतो. चहा पाहिल्यानंतर प्रथम बायकोला खूप आनंद होतो, पण नंतर तिचे केस पाहिल्यावर तिला प्रचंड राग येतो. त्यानंतर ती तिच्या नवऱ्यावर ओरडण्यास सुरूवात करते.

‘व्हायरल ऑल व्हिडीओ’ नावाच्या चॅनलवर हा मजेदार व्हिडीओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहेपर्यंत या व्हिडीओला 88 लाखाहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. हा मजेदार व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक खूप हसत आहेत. (Viral Video: Husband shoots funny video, netizens laughed after watching wife’s reaction)

संबंधित बातम्या

नोकरीच्या शोधात जोडपं निघालं आणि आख्ख गाव वसवलं, ‘इथं’ एकाच वंशाचे 800 लोक राहतात

Video | कसलीही चिंता न करता कारमध्ये ठाण मांडले, डेअरिंगबाज अस्वलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video | पाखरालाही आत येण्यास परवानगी नसलेल्या संसदेत उंदराचा धुडगूस, स्पेनच्या खासदारांची तारांबळ

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI