VIDEO | नाशकात फ्री स्टाईल हाणामारी, सोसायटी अध्यक्ष-सचिवांनी महिलेला मारहाण केल्याचा आरोप

नाशिकच्या सिडको भागातील सोसायटीत किरकोळ कारणावरुन दोन गटांमध्ये जुंपल्याची माहिती आहे. यावेळी वादात पडलेल्या महिलेलाही मारहाण झाल्याचा दावा केला जात आहे.

VIDEO | नाशकात फ्री स्टाईल हाणामारी, सोसायटी अध्यक्ष-सचिवांनी महिलेला मारहाण केल्याचा आरोप
नाशकात रहिवासी महिलेला मारहाणीचा आरोप


नाशिक : नाशिकच्या सिडको भागातील सोसायटीत फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी यांनी रहिवासी महिलेला मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दोन गटांमध्ये सोसायटीच्या आवारात तुंबळ हाणामारी होत असल्याचं दिसत आहे.

नेमकं काय घडलं?

नाशिकच्या सिडको भागातील सोसायटीत किरकोळ कारणावरुन दोन गटांमध्ये जुंपल्याची माहिती आहे. यावेळी वादात पडलेल्या महिलेलाही मारहाण झाल्याचा दावा केला जात आहे. सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडून त्याच सोसायटीमध्ये राहत असलेल्या संबंधित महिलेला मारहाण झाल्याचा आरोप आहे. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

 

जालन्यात ट्रेनमध्ये फेरीवाला आणि प्रवाशांमध्ये हाणामारी

दुसरीकडे, जालन्यात फेरीवाला आणि प्रवाशांमध्ये झालेल्या वादावादीचं पर्यवसन हाणामारीत झाल्याचं पाहायला मिळालं. फेरीवाला आणि प्रवासी यांच्यामध्ये अनेक वेळा असे वाद होत असता. जालना जिल्ह्यातील परतूर येथे रेल्वे स्टेशनवर तपोवन एक्सप्रेसमध्ये फेरीवाला आणि प्रवासी यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर प्रवासी आणि फेरीवाला यांच्यात हाणामारी झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा वाद फक्त भेळ खरेदी करण्यावरुन झाला आहे.

संबंधित बातम्या :

Video | शेतीच्या वादातून तुफान हाणामारी, सैन्यात नोकरीला असलेला तरुण गंभीर जखमी

VIDEO | भेळीवरुन वाद, तपोवन एक्सप्रेसमध्ये प्रवासी आणि फेरीवाल्यांमध्ये हाणामारी

(Nashik free style fighting society secretary chairman allegedly beaten up lady video goes viral)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI