Video | घनदाट जंगलातून वाहनांची ये-जा, मध्येच अस्वलं आलं, पुढे काय झालं ? एकदा पाहाच !

या व्हिडीओमध्ये वाहनांची गर्दी असलेल्या रस्त्यावर दोन अस्वल आले आहेत. भरधावे कारसमोर आलेले अस्वल सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

Video |  घनदाट जंगलातून वाहनांची ये-जा, मध्येच अस्वलं आलं, पुढे काय झालं ? एकदा पाहाच !
Bear viral video

मुंबई : विकास आणि वाढत्या शहरीकरणाचा परिणाम जंगली प्राण्यांवर होत आहे. काँक्रिटीकरण झाल्यामुळे जंगलं नष्ट होत आहेत. त्याचा परिणाम म्हणून जंगली प्राणी मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश करत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वाहनांची गर्दी असलेल्या रस्त्यावर दोन अस्वल आले आहेत. भरधावे कारसमोर आलेले अस्वल सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. (bear struggling to cross road full of vehicles video went viral on social media)

दोन अस्वल धावत धावत रस्त्यावर आले

वाढत्या शहरीकरणामुळे जंगले नष्ट झाली आहेत. माणसांनी इमारती तसेच रस्ते जंगलापर्यंत नेऊन पोहोचवली आहेत. याच कारणामुळे जंगली आणि हिंस्र प्राणी मानवी अधिवासात प्रवेश करत आहेत. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा एका रस्त्यावरील आहे. या व्हिडीओमध्ये दोन अस्वल धावत धावत रस्त्यावर आले आहेत. व्हिडीओमध्ये घनदाट जंगलातून एक रस्ता जाताना दिसतोय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी मोठी झाडे आहेत. याच झाडांमधून अचानकपणे दोन अस्वल समोर आले आहेत.

समोर अस्वल दिसल्यामुळे कारचालसुद्धा घाबरला

रस्त्यावर भरधाव वेगात धावणारी वाहने पाहून त्यातील एक अस्वल जागेवरच थबकले आहे. तर दुसरे अस्वल कशाचाही विचार न करता थेट रस्त्यावर आले आहे. रस्त्यावर आलेले अस्वल दुसऱ्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या ठिकाणी एक कार भरधाव वेगाने अस्वलाच्या समोर आली आहे. समोर अस्वल दिसल्यामुळे कारचालसुद्धा घाबरला आहे. समोर अस्वल दिसल्यामुळे कारचालकाने अचानकपणे ब्रेक दाबल्यामुळे मागची सर्व वाहने जागेवरच थांबली आहेत. वाहने थांबल्यानंतर अस्वलाने रस्ता ओलांडला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे प्राणी असे मानवी वस्तीत शिरत आहेत, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने हा व्हिडीओ पाहून आनंद व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला wayanadan_photography या इन्स्टाग्राम पेजवर अपलोड करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | ऑनलाईन क्लास बंद, शाळेत जावे लागणार म्हणून चिमुकलीचे नाटक, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

Video | शॉपिंग मॉलमध्ये अचानकपणे दिला धक्का, आजीबाईंनी माणसाला चांगलाच धडा शिकवला, नेमकं काय केलं ?

Video | इंदुरची बातच न्यारी, खाली आग वर तवा, ‘फायर डोशाची’ रेसिपी एकदा पाहाच !

(bear struggling to cross road full of vehicles video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI