Video | शॉपिंग मॉलमध्ये अचानकपणे दिला धक्का, आजीबाईंनी माणसाला चांगलाच धडा शिकवला, नेमकं काय केलं ?

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हासुद्धा असाच खळखळून हसवणारा आहे. या व्हिडीओमध्ये एका म्हाताऱ्या आजीने माणसाला चांगलाच धडा शिकवला आहे.

Video | शॉपिंग मॉलमध्ये अचानकपणे दिला धक्का, आजीबाईंनी माणसाला चांगलाच धडा शिकवला, नेमकं काय केलं ?
shopping-funny-video

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ चांगलेच मजेदार असतात. या व्हिडीओंना पाहून अनेकजण आपलं हसू आवरु शकत नाहीत. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हासुद्धा असाच खळखळून हसवणारा आहे. या व्हिडीओमध्ये एका म्हाताऱ्या आजीने माणसाला चांगलाच धडा शिकवला आहे. (man disturbing old age women during shopping video went viral on social media)

माणसाने म्हाताऱ्या आजीसोबत असभ्य वर्तन केले

असं म्हणतात की म्हाताऱ्या माणसांची काळजी घेतली पाहीजे. त्यांना आदराने आणि सन्मानाने वागवले पहिजे. मात्र, सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका माणसाने म्हाताऱ्या आजीसोबत असभ्य वर्तन केले आहे. हा प्रकार पाहून अनेकांना त्या माणसाची चिड आलेली आहे. मात्र, शेवटी म्हाताऱ्या आजीने माणसाला शिकवलेला धडा पाहून याच नेटकऱ्यांना हसूसुद्धा आवरलेले नाही.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा मजेदार असून तो एखाद्या मॉलमधील असावा असा अंदाज बांधला जातोय. या व्हिडीओमध्ये एक आजीबाई तिला हवे असणारे सामान घेताना दिसत आहे. याच वेळी एक माणूस मोबाईलवर बोलत आजीबाईकडे आला आहे. तसेच त्याने एका हाताने आजीला धक्का देत बाजूला सारले आहे. शेवटी आजीला बाजूला करत तो मॉलमध्ये ठेवलेले सामान घेण्यास पुढे सरसावला आहे. हा सर्व प्रकार पाहून आजीबाई चांगलीच भडकली आहे. धक्का दिलेल्या माणसाला तिने जोरदार धक्का दिलाय. या जोरदार धक्क्यामुळे मोबाईलवर बोलणारा माणूस चांगलाच गोंधळला आहे. आजीबाईने धक्का दिल्यामुळे या माणसाच्या अंगावर सर्व सामान पडले आहे.

पाहा व्हिडीओ :

नेटकऱ्यांच्या उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया

हा सर्व प्रकार खळखळून हसवणारा असून नेटकरी त्याला पाहून चांगलेच खुश झाले आहेत. नेटकरी हा व्हिडीओ पाहून उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देत आहेत. तसेच या व्हिडीओला शेअर करत मजेदार कमेंट्स करत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला Ffs OMG Vids या ट्विटर अकाऊंटवर अपलोड कण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | इंदुरची बातच न्यारी, खाली आग वर तवा, ‘फायर डोशाची’ रेसिपी एकदा पाहाच !

VIDEO | नाशकात फ्री स्टाईल हाणामारी, सोसायटी अध्यक्ष-सचिवांनी महिलेला मारहाण केल्याचा आरोप

Video | फोटोंसाठी काहीही! लग्नाचे ‘परफेक्ट क्षण’ टिपण्यासाठी फोटोग्राफारची अनोखी कसरत, पाहणारे म्हणाले ‘हाच तो फोटोग्राफर ऑफ दी इयर’!

(man disturbing old age women during shopping video went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI