AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | सांगलीत पुरामुळे घरं नेस्तनाबूत, झाडं उन्मळून पडली, मगरही आली रस्त्यावर, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सांगली जिल्ह्यात पुराच्या पावसामुळे एक मगर तलाव सोडून थेट रस्त्यावर आली आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video | सांगलीत पुरामुळे घरं नेस्तनाबूत, झाडं उन्मळून पडली, मगरही आली रस्त्यावर, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
crocodile viral video
| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 6:03 PM
Share

मुंबई : पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण पट्ट्यात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. या ठिकाणी शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. एकीकडे पाण्यामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत तर दुसरीकडे पुराच्या पाण्यामुळे जलचर तसेच उभयचर प्राण्यांनासुद्धा याचा फटका बसल्याचे समोर येत आहे. सांगली जिल्ह्यात पुराच्या पावसामुळे एक मगर तलाव सोडून थेट रस्त्यावर आली आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (crocodile seen on sangli road amid flood video went viral on social media)

सांगलीमध्ये कृष्णा नदीला पूर 

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक मगर रस्त्यावर आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ सांगली जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून सांगलीसह इतर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे येथील कृष्णा नदीला पूर आला आहे. त्यामुळेच व्हिडीओतील मगर रस्त्यावर आली आहे.

मगर पाण्यातून थेट रस्त्यावर आली

दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीने आपलं पात्र सोडलं आहे. या नदीच्या पात्रात येणारे सर्व जीव, प्राणी, तसेच झाडे आणि घरं नेस्तनाबूत झाली आहेत. याच कारणामुळे व्हिडीओमध्ये दिसणारी मगरसुद्धा आपला नैसर्गिक अधिवास सोडून थेट रस्त्यावर आली आहे. ही मगर व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

ही मगर रस्त्यावर आल्याचे दिसत असले तरी तिने कोणताही उपद्रव केलेला नाही. रस्त्यावर आल्यानंतर ही मगर पुन्हा बाजूच्या पाण्यात गेल्याचे दिसत आहे. मात्र, पाऊस आणि पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे तसेच मगर रस्त्यावर आल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इतर बातम्या :

Video | विंकिंग गर्ल प्रिया वारियरच्या नव्या व्हिडीओची चर्चा, साडीमधील डान्स पाहून नेटकरी घायाळ

Video | गुलाबजाम घेऊन नवरदेव नवरीकडे आला, पण नथ आडवी आली, पुढे काय झालं ?

Bachpan Ka Pyaar : ‘बचपन का प्यार’ फेम सहदेवचं नशीब उघडलं, लवकरच झळकणार बादशाहच्या गाण्यात?

(crocodile seen on sangli road amid flood video went viral on social media)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.