VIDEO | दिल्लीच्या नाल्यात बाईक हरवली, हेल्मेट घातलेला चालक कावराबावरा झाला

Delhi Rain Viral Video : सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये मुसळधार पावसात एक बाईक हरवली आहे. चालक आपली बाईक शोधत आहे.

VIDEO | दिल्लीच्या नाल्यात बाईक हरवली, हेल्मेट घातलेला चालक कावराबावरा झाला
viral photo
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 09, 2023 | 3:42 PM

दिल्ली : देशात अनेक राज्यात मुसळधार पाऊस (heavy rain maharashtra) झाला आहे. हवामान खात्याने जाहीर केल्याप्रमाणे पावसाने दिल्लीत मागच्या वीस वर्षापूर्वीचा रेकॉर्ड (delhi maharashtra) तोडला आहे. मुसळधार पावसामुळे दिल्लीतील काही परिसरात पाणी साचले आहे. त्याचबरोबर नाल्यांना नदीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. तिथला एक व्हिडीओ व्हायरल (video viral) झाला आहे. काही ठिकाणी पाण्यातून गाड्या वाहून गेल्याचं स्पष्ट दिसतं आहे. सध्या जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. मुसळधार पाऊस सुरु असताना एकजण बाईकवरुन निघाला होता. त्यावेळी त्याची बाईक त्या नाल्यात गेली आणि वाहून गेली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ दिल्लीतील संगम विहार परिसरातील आहे. तिथं मुसळधार पावसामुळं नाले भरुन निघाले आहेत. त्याचबरोबर सगळीकडं पाणीचं पाणी होतं. त्यावेळी एक व्यक्ती आपली बाईक घेऊन निघाला होता. तिथं असलेले गटार त्याला दिसलं नाही. तो थेट गटारात गेला, हेल्मेट घातलेला तो व्यक्ती तिथं आपली बाईक शोधत असताना दिसत आहे.

तो चालक गटाराच्या बाजूला पडला. त्यावेळी त्याची गाडी गटारात गेली. तिथं असलेल्या लोकांनी त्या व्यक्तीला वरती काढलं. गाडीवरुन पडल्यामुळं त्या व्यक्तीला मार सुध्दा लागला आहे. व्हिडीओमध्ये तिथं सगळीकडं पावसाचं पाणी साचलं आहे.


मुसळधार पावसामुळे चांगलचं नुकसान

दिल्लीतील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही रिक्षाचं तर पाणी गेल्यामुळं अधिक नुकसान झालं आहे. काही दुकानात सुध्दा पाणी गेलं आहे. काही लोकांचा मृत्यू देखील झाला आहे.