सूसाट वारा, वादळी हवामानात भरकटलेल्या विमानाचं खतरनाक लँडिंग VIDEO VIRAL , प्रवाशांचा जीव टांगणीला
वादळाचा फटका विमानाला बसला. त्यामुळे प्रवाशांनी भरलेले विमान हवेतच गटांगळ्या खाऊ लागले.लँडिंग करत असताना वाऱ्यामुळे विमानाच्या चाकांची दिशा बदलली आणि ते धावपट्टी सोडून.... त्यावेळीचा हा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

विमानात जराही काही बिघाड झाला तरी लाखो प्रवाशांचे प्राण टांगणीला लागतात. पण विमान लँड होताना असा थरार अनुभवायला मिळेल याची कोणी कल्पनाही केली नसेल. ब्रिटनच्या विमानतळावर असंच काहीसं भयानक घडलं. ज्यामुळे लाखो प्रवाशांचे प्राण धोक्यात आले असते.
ब्रिटनमधील बर्मिंगहॅम विमानतळावर एक विमान लँडिंग करण्याच्या तयारीत होतं.पण वारं इतकं जोरदार होतं की त्यामुळे विमानाची चाके धावपट्टीच्या दिशेने जाण्याचं सोडून बाजूला असलेल्या गवताळ प्रदेशात गेली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पण सुदैवाची गोष्ट म्हणजे वैमानिकाने शर्थीचे प्रयत्न केले आणि विमान पुन्हा धावपट्टीच्या दिशेने वळवले. त्यामुळे मोठा अपघात होण्यापासून टळला आहे आणि सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
ही घटना जेटर एअरलाईनचं LS1310 क्रमांकाचं विमान इटलीतील व्हेनिस येथून बर्मिंगहॅमला येतं होतं. हे बोईंग 737-800 प्रकाराचं प्रवासी विमान होतं. विमान बर्मिंगहॅमला विमानतळावर लँड होत असताना जोरदार वाऱ्यामुळे ते धावपट्टीच्या डाव्या बाजूला सरकले.
वादळाचा तडाखा
ब्रिटनमध्ये त्या दिवशी स्टॉर्म बोएलो या वादळामुळे अनेक भागांत जोरदार वारे आणि तुफानी पाऊस होता. खराब हवामानाच अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला होता.
व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विमान धावपट्टीवर लँड होताना अचानक बाजूला सरकल्याचं स्पष्टपणे दिसतं आहे. हा व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या असून प्रवाशांचा सुरक्षेसाठी अनेकांनी प्रार्थना केली होती. तर काहींनी विमान प्रवास आता फार धोकादायक वाटतो असे देखील म्हटले आहे.