VIDEO : मेहबूबाला पाठीवर घेऊन जाण्याच्या नादात झाले भलतेच, व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल!

VIDEO : मेहबूबाला पाठीवर घेऊन जाण्याच्या नादात झाले भलतेच, व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल!
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होणार काही व्हिडीओ बघितले की, आपण स्वत: ला हसवल्याशिवाय राहू शकत नाहीत. मात्र, ते व्हिडीओ बघितल्यानंतर आपल्याला सुरूवातीला आश्चर्य देखील वाटते. असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 03, 2022 | 7:31 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होणार काही व्हिडीओ बघितले की, आपण स्वत: ला हसवल्याशिवाय राहू शकत नाहीत. मात्र, ते व्हिडीओ बघितल्यानंतर आपल्याला सुरूवातीला आश्चर्य देखील वाटते. असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा व्हायरल होणारा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडताना दिसत आहे.

नाला ओलांडतानाचा व्हिडीओ व्हायरल 

या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की एक मुलगा आणि मुलगी एकत्र जात असताना अचानक त्यांच्या समोर एक नाला आला. अगोदर मुलगा नाला ओलांडतो, परंतु त्याच्यासोबत असलेल्या मुलीला नाला ओलांडणे शक्य होत नाही. मग तो मुलगा मुलीला आपल्या पाठीवर घेतो आणि नाल्यावर टाकलेल्या फळीवरून चालतो. मात्र, ती फळी या दोघांचे वजन सहन करू शकत नाही आणि फळी तुटते. यामुळे मुलगा आणि मुली दोघेही नाल्यामध्ये पडतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by I love Surfing (@i_love.surfing)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर युजर्स पसंत करत आहेत. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. हा मजेदार व्हिडिओ ‘i_love.surfing’ नावाने इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे, तर 22 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. हा मजेदार व्हिडिओ पाहून तुम्ही हसल्याशिवाय राहणार नाहीत.

संबंधित बातम्या : 

CCTV | निवांतपणे चालत होता, अचानक सळी कोसळली, डोक्यात घुसली, पुढचं सगळंच सुन्न करणारं..

VIDEO : परीक्षेमध्ये कॉपी करण्यासाठी विद्यार्थ्याने केला खतरनाक जुगाड, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें