VIDEO : परीक्षेमध्ये कॉपी करण्यासाठी विद्यार्थ्याने केला खतरनाक जुगाड, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल!

VIDEO : परीक्षेमध्ये कॉपी करण्यासाठी विद्यार्थ्याने केला खतरनाक जुगाड, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल!
व्हायरल व्हिडीओ

बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याचा कंटाळा येतो. जिद्द, मेहनत आणि अभ्यास करण्याची त्यांची तयारी नसते. मात्र, परीक्षेमध्ये त्यांना पास देखील व्हायचे असते. मग अशावेळी विद्यार्थी कॉपी करून पास होण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवतात. सध्या आपल्या देशामध्ये कोरोना रूग्णांची संख्या चांगलीच वाढली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 02, 2022 | 2:34 PM

मुंबई : बऱ्याच विद्यार्थ्यांना (Student) अभ्यास करण्याचा कंटाळा येतो. जिद्द, मेहनत आणि अभ्यास करण्याची त्यांची तयारी नसते. मात्र, परीक्षेमध्ये (Exam) त्यांना पास देखील व्हायचे असते. मग अशावेळी विद्यार्थी कॉपी (Copy) करून पास होण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवतात. सध्या आपल्या देशामध्ये कोरोना रूग्णांची संख्या चांगलीच वाढली आहे. मात्र, अजूनही शाळा आणि महाविद्यालय मात्र सुरू आहेत.

परीक्षेमध्ये कॉपी करण्यासाठी विद्यार्थ्याची शक्कल

विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये. यामुळे शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरामध्ये मास्कच लावूनच फिरण्याची परवानगी आहे. मग ते क्लास असो किंवा परीक्षा…सध्या सोशल मीडियावर असाच एक कोरोना काळातील परीक्षेचा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक क्लास रूम दिसते आहे. तिथे परीक्षा देण्यासाठी बरेच विद्यार्थी आहेत. मात्र, तेथील एका विद्यार्थ्यांने चक्क मास्कमध्ये कॉपी आणली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by memes | news | comedy (@ghantaa)

हा जुगाड सोशल मीडियावर लोकांना खूप आवडला आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “कॉपी करण्यासाठी असेही घडू शकते याची कोणीही कल्पना करू शकत नाही.” तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, “या विद्यार्थ्याने आपत्तीचे संधीत रूपांतर केले.” यावर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. हा व्हिडिओ सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.

संंबंधित बातम्या : 

VIDEO : सैनिकांच्या कार्यक्रमात जलवा तेरा जलवा…गाण्यावर तरुणीचा खास डान्स, पाहा व्हिडीओ!

VIDEO : मांजरीची घसरगुंडीवर मस्ती, व्हिडिओ पाहून तुम्हालाही बालपणीचे दिवस आठवतील!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें