AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: पाठीवर झाडाची पानं बांधली, आणि उंच झेप घेतली, चिमुरड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

घराच्या छताचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी मोठ्या पानांचा वापर केला गेला. त्या मोठ्या पानांपैकी पान एक घेऊन हे मूल छताच्या काठावर उभे राहितं. हे पान हातावर आणि पाठिवर बांधतं, जेणेकरुन तो गरुडासारखा दिसेल.

Video: पाठीवर झाडाची पानं बांधली, आणि उंच झेप घेतली, चिमुरड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये निरागस मुलाची हवेत उडण्याची आशा दिसते.
| Edited By: | Updated on: Oct 13, 2021 | 5:58 PM
Share

तुम्ही कधी मुलांना उंचीवरून जमिनीवर उडी मारताना पाहिले आहे का? जर हो, तर तुम्हाला त्यांच्यातील उत्साह काय असतो हे नक्कीच पाहायला कळेल. त्यांना फक्त प्रोत्साहनाची गरज आहे, बाकीचे स्वतःची स्वप्नं पुरी करण्यासाठी सक्षम असतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये निरागस मुलाची हवेत उडण्याची आशा यातून दिसते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याला ‘होप टू फ्लाई’ असे म्हटलं जात आहे. (Boy trying to fly in the sky with a tree leaf tied to his back, video goes viral)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये पाहु शकता की, डोंगराळ भागात एका घराच्या छपराचं काम सुरु आहे, या छपरावर एक मूल उभं आहे. या दरम्यान, त्याच्यासोबत काही कुटुंबातील सदस्यही आहेत, जे त्यांच्या घराची दुरुस्ती करत आहेत. घराच्या छताचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी मोठ्या पानांचा वापर केला गेला. त्या मोठ्या पानांपैकी पान एक घेऊन हे मूल छताच्या काठावर उभे राहितं. हे पान हातावर आणि पाठिवर बांधतं, जेणेकरुन तो गरुडासारखा दिसेल.

पाहा व्हिडीओ:

मुलाने त्याच्या पाठीवर मोठी पाने बांधताच, त्याच्यापासून दूर उभ्या असलेल्या कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवला. मुलाला आता त्याच्या झोपडीसारख्या छतावरून जमिनीवर उडी मारायची होती. उडी मारताना त्याला गरुडासारखे हवेत उडायचे होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. IAS अधिकारी अश्विन शरण यांनी त्यांच्या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘ही’ आशा ‘आहे जी तुम्हाला उडायला शिकवते. हा व्हिडीओ अरुणाचल प्रदेशातील आहे, पण जागेचं नाव कळू शकलेलं नाही.

हेही पाहा:

Video: गाडी पकडली, मारहाण केली, आता 5 लाखांची बाईकच खराब केली, बिहार पोलिसांच्या दबंगगिरीवर नेटकरी भडकले

Video: 5 वाघांच्या तावडीत सापडला कुत्रा, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, निसर्गात काहीही होऊ शकतं!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.