Video: गाडी पकडली, मारहाण केली, आता 5 लाखांची बाईकच खराब केली, बिहार पोलिसांच्या दबंगगिरीवर नेटकरी भडकले

वाहन तपासणी मोहिमेदरम्यान पोलिसांनी या व्यक्तीची गाडी पकडली. त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पोलीस कर्मचारी म्हणतो आहे की, "तू चोर आहे, तू गुन्हेगार आहे, आम्ही तुला मारणार, जेव्हा आम्ही गाडी थांबव सांगत होतो, तेव्हा पळून का गेला?"

Video: गाडी पकडली, मारहाण केली, आता 5 लाखांची बाईकच खराब केली, बिहार पोलिसांच्या दबंगगिरीवर नेटकरी भडकले
बिहार पोलिसांच्या दबंगगिरीवर नेटकरी भडकले

पोलिसांचे व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात, काही व्हिडीओ मजेदार असतात, तर काही गुंडांना अद्दल घडवणारे. पण बिहार पोलिसांचं याच्या पलिकडे काहीतरी असतं. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्तीसोबत पोलीस असभ्य वर्तन करताना दिसत आहेत. वाहन तपासणी मोहिमेदरम्यान पोलिसांनी या व्यक्तीची गाडी पकडली. त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पोलीस कर्मचारी म्हणतो आहे की, “तू चोर आहे, तू गुन्हेगार आहे, आम्ही तुला मारणार, जेव्हा आम्ही गाडी थांबव सांगत होतो, तेव्हा पळून का गेला?” त्यावर हा व्यक्ती सांगतो की, सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा, मी पळालो की नाही कळेल लगेच.( Bihar police officer threatens to prove innocent guilty watch viral video)

नंतर व्हिडिओमध्ये पुढे पाहु शकता की, पोलीस कर्मचारी त्या व्यक्तीला मारतो आणि त्याचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तो काहीही रेकॉर्ड करू शकत नाही. आता या व्हिडिओनंतर, त्या व्यक्तीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात त्यानं सांगितले की, संपूर्ण दिवस पोलीस ठाण्यात घालवल्यानंतर, पोलिसांनी त्याची माफी मागितली आणि संध्याकाळी त्याला सोडून गेले. या दरम्यान, महिला कॉन्स्टेबलने त्या व्यक्तीला धमकी दिली की ती त्याच्याविरुद्ध खोटा खटला नोंदवला जाईल. हेच नाही 5 लाख रुपये किंमतीची दुचाकी पोलिसांनी नष्ट केल्याचा आरोपही या व्यक्तीने केला आहे

व्हिडीओ पाहा:

 

View this post on Instagram

 

A post shared by Santan Chaudhary (@bikesway_official)

आता या व्हिडिओवर नेटकरी बरेच संतप्त झालेला पाहायला मिळत आहेत. बहुतांश लोक पोलीस कर्मचाऱ्याच्या वर्तवणुकीने खूप निराश आहेत आणि बाईकरला पाठिंबा देत आहेत.एकाने कमेंटमध्ये लिहिले, ‘अशा पोलिसांना निलंबित करा’, दुसऱ्याने लिहिले की ‘त्या महिला पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, एखाद्या कायद्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये’ तिसऱ्याने लिहिले, ‘अशा पोलिसांची जागा आहे पोलीस ठाण्यात नाही, त्यांनी घरात बसावे. याशिवाय, काहींनी लिहिले – भाऊ, तुम्हाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, लढत राहा.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर अपलोड झाला आहे. व्हिडिओ bikesway_official च्या पेजवर शेअर केला गेला आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या प्रत्येक पेजवर पाहिला जात आहे. तसेच, लोक त्यांच्या जबरदस्त प्रतिक्रिया शेअर करत आहेत. हा व्हायरल व्हिडिओ शेअर करताना, पेजच्या अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिले, “मध्यमवर्गीय कुटुंबातील असणं, ही माझी चूक आहे! मी पाटणा वाहतूक एसएसपीला हस्तक्षेप करून कडक कारवाई करण्याची विनंती करतो. आता 73 तास झाले, बाकी मी वाट पाहत आहे.”

हेही वाचा:

Video: 5 वाघांच्या तावडीत सापडला कुत्रा, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, निसर्गात काहीही होऊ शकतं!

Navratri in Kabul Afghanistan: तालिबानच्या राज्यात ‘हरे रामा, हरे कृष्णा’चा डंका, नवरात्रीनिमित्त काबुलच्या मंदिरात किर्तन, जागरण आणि भंडारा

 

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI