AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: 5 वाघांच्या तावडीत सापडला कुत्रा, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, निसर्गात काहीही होऊ शकतं!

सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात अनेक वाघ एकत्र बसलेले आहेत. या वाघांमध्ये कुत्राही दिसतो.

Video: 5 वाघांच्या तावडीत सापडला कुत्रा, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, निसर्गात काहीही होऊ शकतं!
वाघ कुत्र्याजवळ येतो आणि त्याचा वास घेतो. मग तो त्याच्या अंगावर मान घासतो
| Edited By: | Updated on: Oct 13, 2021 | 2:53 PM
Share

जंगलाचं नाव ऐकताच लोकांच्या मनात भीती तयार होते, ती भीती असते वन्यप्राण्याची. किंबहुना असे अनेक प्राणी जंगला राहतात, ज्यांच्या समोर माणसांच्या थरकाप उडतो. पण जरी जंगल अनेक धोकादायक प्राण्यांचे घर असलं, तरी दादागिरीच्या बाबतीत वाघाची तुलना होऊ शकत नाही. म्हणूनच त्याला जंगलाचा राजा म्हटलं जातं. हेच कारण आहे की बहुतेक प्राणी वाघापासून दूर राहण्यातच आपलं कल्याण मानतात. पण कधीकधी आपण अशी दृश्ये पाहतो ज्यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण होतं. (Dog trapped alone among five tigers see what happend next in video)

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. खरं म्हणजे सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात अनेक वाघ एकत्र बसलेले आहेत. या वाघांमध्ये कुत्राही दिसतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही असा विचार करत असाल की आता कुत्र्याचं आता काम झालं. तो काही वाचत नाही. पण थांबा, तुम्ही थोडी घाई केली. कोणत्याही निष्कर्षावर जाण्यापूर्वी, हा व्हिडिओ थोडा काळजीपूर्वक पाहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण प्रकरण समजेल.

व्हिडीओ पाहा:

वाघ कुत्र्याजवळ येतो आणि त्याचा वास घेतो. मग तो त्याच्या अंगावर मान घासतो, कुत्रा त्याला घाबरलेला दिसतो आहे, सोबत दोन वाघही वरच्या खडकावर बसलेले असतात. या दरम्यान, अचानक एक पांढरा वाघ येतो आणि थेट कुत्र्याकडे जाऊन थांबतो आणि तो कुत्र्याला वास देऊन खूप काळजीपूर्वक पाहतो. यामध्ये आणखी दोन वाघ तेथे येतात. आता कुत्रा पाच वाघांमध्ये एकटा अडकतो. मात्र, पुढे काय झाले याबद्दल काहीच माहिती नाही. म्हणूनच लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की शेवटी कुत्र्याचे काय झाले?

या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या कमेंट्सही केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, मी हे पाहून खरोखर घाबरलो आहे. दुसर्‍याने लिहिले की, मला असे वाटते की हा कुत्रा वाघाबरोबर मोठा झाला आहे, म्हणून कदाचित तो त्यांच्यामध्ये सुरक्षित आहे. तर काही लोकांनी आपली भीती व्यक्त केली आणि लिहिले की आम्हाला माहित आहे की प्रत्यक्षात तो वाघांचा शिकार होणार आहे. हा व्हिडिओ 12 ऑक्टोबर रोजी आपल्या yournaturegram नावाच्या इन्स्टाग्राम हँडलद्वारे शेअर करण्यात आला होता, ज्याला ही बातमी लिहीपर्यंत 20 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही पाहा:

Video: महाकाय व्हेल बोटीजवळ आली, महिलेसोबत खेळली, बोटीला धक्काही दिला, वाढदिवसाच्या दिवशीच महिलेसोबत भर समुद्रात काय काय झालं?

Navratri in Kabul Afghanistan: तालिबानच्या राज्यात ‘हरे रामा, हरे कृष्णा’चा डंका, नवरात्रीनिमित्त काबुलच्या मंदिरात किर्तन, जागरण आणि भंडारा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.