ब्रेकअप होताच बॉयफ्रेंड भडकला; प्रेयसीच्या बाथरूममध्ये घुसून काय पळवलं?

प्रियकर आणि प्रेयसीची भांडणे होऊन जेव्हा ब्रेकअप होतात. त्यावेळी अनेकदा एकमेकांना शिव्याशाप देऊन गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड विलग होतात. परंतू कोणी जरी प्रेयसीला त्रास देताना बदला म्हणून जर विचित्र वागले तर त्या ब्रेकअपमध्ये नैराश्याच्या ऐवजी हसु देखील येते. अशीच एक ब्रेकअप कहानी ऐकून तुम्हाला हसावे की रडावे हे कळणार नाही.

ब्रेकअप होताच बॉयफ्रेंड भडकला; प्रेयसीच्या बाथरूममध्ये घुसून काय पळवलं?
break upImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 27, 2024 | 10:05 PM

अनेकदा प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात काही कारणांनी ब्रेक झाल्यास ते एकमेकांना सोडताना भांडणं करतात. एकमेकांना अद्वातद्वा बोलतात आणि आपलं ब्रेकअप जाहीर करतात. परंतू एका तरुणीला आलेला अनुभव पाहून तिला आपल्या बॉयफ्रेंडवर हसावं कि रडावं हे समजेना. कारण तिच्या बॉयफ्रेंड असा प्रताप केला की कोणी विचारही करु शकणार नाही. या बॉयफ्रेंडची तिला कायम आठवण राहील असा प्रकार त्याने केला आहे.

रेडिट पोस्टवर एका तरुणीने तिचा ब्रेकअपचा अनुभव शेअर केला आहे. या तरुणी तिचा बॉयफ्रेंड हॉटेलिंगचा आपल्या वाट्याचे बिल भरायचा नाही. शिवाय वेटरला टीप देखील द्यायचा नाही. बॉयफ्रेंडच्या जेवण आणि नाश्ताचा भार पेलून तिचा जीव मेटाकुटीला आला. अखरे तिने त्याला सोडण्यचा निर्णय घेतला. एके दिवशी मोठ्या भांडणानंतर त्यांच्या दोघांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर ती रागाने आपल्या बेडरुममध्ये जाऊन बिछान्यावर पडली. इथे तिचा बॉयफ्रेंड घरातील त्याचे कपडे आणि इतर त्याचे सामान घेऊन निघाला. त्यावेळी तिला झोप लागल्याने तिने काही लक्ष दिले नाही.

ही तरुणी जेव्हा झोपेतून उठली तेव्हा तिला धक्काच बसला. कारण तिचा बॉयफ्रेंड तिच्या घरातील टॉयलेट पॉट घेऊन पसार झाला होता. आपला बॉयफ्रेंड असे करू शकत होता कारण तो लायसन्स प्राप्त प्लंबर होता. त्यामुळे त्याला टॉयलेटचे भांडे कसे काढायचे याचे पूर्ण ज्ञान होते असे या तरुणीने म्हटले आहे. ब्रेकअपच्या कारणांबाबत विस्ताराने सांगताना तिने म्हटले की त्याच्याबाबत मला काही समजत नव्हते तो असे का वागत होता. रेस्टॉरंटमध्ये सर्व्हरला टीप द्यायलाही तो तयार व्हायचा नाही. जपानमध्ये माझ्यासोबत राहताना त्याने कधीच वीजेचे बिल भरले नाही असेही तिने म्हटले आहे.

घरात राहणे कठीण झाले होते

घरात एका एक्स्ट्रा  शौचालयाशिवाय रहाणे कठीण झाले होते. टॉयलेट पॉट गायब झाल्याने तिला टॉयलेटसाठी शेजारच्या दुकानात जावे लागत होते. आता तिने नवीन पॉट बसवून घेतले आहे. या महिलेच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की मला ब्रेकअप पेक्षा जास्त दु:ख टॉयलेट पॉटच्या गमावण्याचे झाले आहे. तर अन्य एका युजरने म्हटले की किती मजेदार ब्रेकअप आहे.

Non Stop LIVE Update
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.