AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | नवरदेव लग्न विधीमध्ये गुंतला, नवरीचा पाणीपुरीवर ताव, हटके व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या अशाच एका लग्न समारंभातील व्हिडीओ चर्चेचा विषय़ ठरला आहे. या व्हिडीओमध्ये नवी नवरी तिच्या लग्नात चक्क पाणीपुरीचा आस्वाद घेत आहे.

Video | नवरदेव लग्न विधीमध्ये गुंतला, नवरीचा पाणीपुरीवर ताव, हटके व्हिडीओ एकदा पाहाच
bride viral video
| Edited By: | Updated on: Jun 20, 2021 | 6:49 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे लग्न समारंभातील असतात. सध्या अशाच एका लग्न समारंभातील व्हिडीओ चर्चेचा विषय़ ठरला आहे. या व्हिडीओमध्ये नवी नवरी तिच्या लग्नात चक्क पाणीपुरीचा आस्वाद घेत आहे. (Bride eating Golgappa Panipuri in marriage video went viral on social media)

नवरीच्या सौंदर्याची नेटकऱ्यांकडून प्रशंसा

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अतिशय आकर्षक असा मेकअप केलेली नवरी दिसत आहे. या नवरीने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच तिच्या गळ्यात लाल रंगाची वरमालासुद्धा आहे. तिचा हा साज पाहून नेटकरी तिच्या सौंदर्याची प्रशंसा करत आहेत. यावेळी ही नवरी खुर्चीवर शांतपणे फक्त बसलेली नाही तर ती मस्तपैकी पाणीपुरीचा आस्वाद घेत आहे.

नवरीकडून बिनधास्तपणे पाणीपुरीचा आस्वाद

तिच्यासमोर एका माणसाचे पाणीपुरीची प्लेट धरलेली आहे. या प्लेटमधून ही नवरी एक-एक पाणीपुरी उचलून खात आहे. पाणीपुरीचा आस्वाद घेताना तिला कसलीही चिंता नसल्याचे दिसतेय. लग्नविधी सुरु आहे, समोर लोक असतील, अशा परिस्थितीमध्ये आपण पाणीपुरी कशी खावी ? असे कोणतेही प्रश्न या नवरीला पडत नाहीयेत. आपल्याच धुंदीमध्ये ही नवरी पाणीपुरीचा आस्वाद घेत आहे.

नवरदेव विधी पार पाडण्यात गुंतला

व्हायरल होत असलेल्या बहुतांश व्हिडीओंमध्ये नवरी तसेच नवरदेव असतात. मात्र, या व्हिडीओमध्ये आपल्याला फक्त नवरीच दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार नवरदेव हा लग्न विधी पार पाडण्यात गुंतलेला आहे. हीच वेळ साधत नवरीने पाणीपुरीवर ताव मारला आहे.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Weddingvows (@wed.vows)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याला wed.vows या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. लोक हा व्हिडीओ पाहून मजेदार कमेंट्स करत असून लाईकही करत आहेत.

इतर बातम्या :

Video | एकाकीपणा घालवण्यासाठी तरुणाचा जबरदस्त जुगाड, नेटकरी म्हणतायत हा तर सर्वोत्तम उपाय !

Video | ‘मैं शराबी हूं’ गाण्यावर तरुण थिरकला, हावभाव पाहून सोशल मीडियावर धुमाकूळ

Video | महिला पोलिसाची अरेरावी, कोरोना नियम मोडून म्हणते “होमगार्ड आहेस, होमगार्डसारखे राहा..”

(Bride eating Golgappa Panipuri in marriage video went viral on social media)

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.