Video | ‘मैं शराबी हूं’ गाण्यावर तरुण थिरकला, हावभाव पाहून सोशल मीडियावर धुमाकूळ

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: prajwal dhage

Updated on: Jun 20, 2021 | 5:18 PM

या व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर नेहमी धुमाकळू उडालेला असतो. सध्या तर एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील माणसाचे डान्स करतानाचे हावभाव धम्माल उडवणारे आहेत.

Video | 'मैं शराबी हूं' गाण्यावर तरुण थिरकला, हावभाव पाहून सोशल मीडियावर धुमाकूळ
DANCE VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियावरचं जग हे मोठं व्यापक आहे. या मंचावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. आपण कधी कल्पनाही केली नसेल असे व्हिडीओ समजमाध्यमांवर व्हायरल होतात. या व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर नेहमी धुमाकळू उडालेला असतो. सध्या तर एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील माणसाचे डान्स करतानाचे हावभाव धम्माल उडवणारे आहेत. (young man dancing on Hindi songs giving weird expressions video went viral on social media)

तरुणाचा मजेदार डान्स

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही लोक डीजेवर धडाकेबाज डान्स करताना दिसत आहेत. सगळे लोक गाण्याच्या तालावर थिरकत आहेत. मात्र नाचणाऱ्यांमध्ये एक तरुण सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तो अतिशय मजेदार डान्स करतोय. डान्स करताना तो फक्त अंग हालवत नाहीये. तर गाण्याच्या तालावर तसेच संगिताच्या बिट्सवर तो आपल्या चेहऱ्यावरील हावभाव बदलतो आहे.

‘लोग कहते हैं मैं शराबी हूं” तरुण थिरकला 

व्हिडीओतील तरुण हिंदी चित्रपटातील ‘लोग कहते हैं मैं शराबी हूं’ या गाण्यावर डान्स करतो आहे. तरुण डान्स करत असताना बाजूचे लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहत आहेत. काही लोकांनी या तरुणाच्या आकर्षक डान्सचा व्हिडीओ शूट केला आहे. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेटकऱ्यांच्या मजेदार कमेंट्स

या तरुणाला पाहून नेटकरी मजेदार कमेंट्स करत आहेत. तुम्ही कितीही चांगला डान्स करा. पण डान्स करताना जर हावभाव नसतील तर त्याचा काहीही उपयोग नाही, असे काही नेटकरी म्हणत आहेत. तर एका नेटकऱ्याने तरुणाच्या डान्ससमोर बॉलिवूडमधील हिरोसुद्धा फिके पडले आहेत, अशी कमेंट केली आहे.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकरी उत्स्फूर्तपणे कमेंट्स करत आहेत. तरुणाचे हावभाव आणि त्याची डान्स करण्याची हटके पद्धत पाहून नेटकरी आनंदीत झाले आहेत. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

Video | कार आणि बाईकवर थरारक स्टंट, व्हायरल व्हिडीओ पाहाच

Video | लग्नानंतर नात्यामध्ये काय बदल होतो ? मजेदार व्हिडीओ पाहाच

Video | महिला पोलिसाची अरेरावी, कोरोना नियम मोडून म्हणते “होमगार्ड आहेस, होमगार्डसारखे राहा..”

(young man dancing on Hindi songs giving weird expressions video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI