Video | कार आणि बाईकवर थरारक स्टंट, व्हायरल व्हिडीओ पाहाच

ध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येसुद्धा काही लोक अशाच प्रकार स्टंट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच अवाक् झाले असून या व्हिडीओची सध्या मोठी चर्चा सुरु आहे.

Video | कार आणि बाईकवर थरारक स्टंट, व्हायरल व्हिडीओ पाहाच
bike and car viral video
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jun 20, 2021 | 4:26 PM

मुंबई : प्रसिद्धी आणि लक्ष वेधून घेण्यासाठी लोक कधी काय करतील हे सांगता येत नाही. काहीतरी वेगळं करण्याच्या इच्छेपोटी अनेकजण थरारक स्टंट करतात. स्टंट करुन लोकांची वाहवा मिळवण्यासाठी हे लोक कसोशीने प्रयत्न करतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येसुद्धा काही लोक अशाच प्रकारे स्टंट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच अवाक् झाले असून त्यातील स्टंटची सध्या मोठी चर्चा सुरु आहे. (dangerous stunt on Bike and Car video went viral on social media)

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही लोक दुचाकी तसेच कारमध्ये बसून थरारक कसरती करत आहेत. या कसरती पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला काही लोक दुचाकीवर बसून स्टंटबाजी करताना दिसत आहेत. हे स्टंटमॅन बाईक हवेत उचलत नेत कोलांटउड्या घेत आहेत. काही जण तर बाईक हवेत सोडून देत पुन्हा बाईकला पकडत आहेत. स्टंटमॅनच्या दुचाकीवरील या कसरती चांगल्याच चित्तवेधक आहेत.

दुचाकीवर बसून थरारक कसरती

तसेच काही स्टंटमॅन हे चारचाकीवरुन स्टंटबाजी करत आहेत. हे लोक फक्त दोन चाकांवर कार चालवताना दिसत आहेत. एवढंच नाही तर दोन चाकांवर कार चावलत असताना हे स्टंटमॅन तोल सांभाळत लोकांकडे पाहत आहेत. तसेच ते प्रेक्षकांना हातवारेसुद्धा करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ जुना असल्याचे काही नेटकरी म्हणत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओला पाहून अतिशय उत्स्फूर्तपणे कमेंट्स केल्या आहेत. सध्या हा व्हिडीओ आयपीएस रुपीन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video | लग्नानंतर नात्यामध्ये काय बदल होतो ? मजेदार व्हिडीओ पाहाच

Video | महिला पोलिसाची अरेरावी, कोरोना नियम मोडून म्हणते “होमगार्ड आहेस, होमगार्डसारखे राहा..”

Video | ग्राहकांना सेवा देण्याची अनोखी पद्धत, थेट हवेत फेकतो डोसा, पाहा मजेदार व्हिडीओ

(dangerous stunt on Bike and Car video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें