AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | ग्राहकांना सेवा देण्याची अनोखी पद्धत, थेट हवेत फेकतो डोसा, पाहा मजेदार व्हिडीओ

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण अतिशय आश्चर्यकारक पद्धतीने लोकांना डोसा देतोय. त्याची ही विशेष पद्धत पाहून नेटकरी चक्रावले आहेत.

Video | ग्राहकांना सेवा देण्याची अनोखी पद्धत, थेट हवेत फेकतो डोसा, पाहा मजेदार व्हिडीओ
DOSA MAN VIRAL VIDEO
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 11:37 PM
Share

मुंबई : आपल्या देशात टॅलेन्टला कमी नाही. कधी कोण काशामध्ये पारंगत असेल हे सांगता येत नाही. चहा विकणाऱ्यापासून ते भाजीवक्रेत्यापर्यंतच्या लोकांमध्ये आपल्या देशात काहीतरी कलाकारी दडलेली असते. लोक आपल्या व्यवसायामध्येसुद्धा कलात्मकता आणून त्याला वाढवण्याचा प्रयत्न करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण अतिशय आश्चर्यकारक पद्धतीने लोकांना डोसा देतोय. त्याची ही विशेष पद्धत पाहून नेटकरी चक्रावले आहेत. (man throws dosa in air before serving to customers video went viral on social media flying dosa)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण डोसा तयार करतो आहे. गरमागरम डोसा लोकांना खायला देताना हा तरुण अनोखी पद्धत वापरतोय. तव्यावर डोसा बनवून झाल्यानंतर हा तरुण त्याला व्यवस्थित कापून थेट हवेत फेकतो आहे. विशेष म्हणजे डोसा एवढा उंचावर फेकलेला असूनदेखील त्याला कालाही होत नाहीये. हा डोसा थेट बाजूला उभ्या असलेल्या त्याच्या नोकराच्या प्लेटमध्ये जाऊन पडतोय. नंतर हा नोकर ग्राहकांना गरमागरम डोसा देत आहे.

डोसा तयार करतानाचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा

या तरुणाच्या स्टॉलवर लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्याच्या डोसा देण्याच्या मजेदार पद्धतीमुळेच कदाचित लोक त्याच्याकडे येत असावेत. त्याची काम करण्याची गती आणि पद्धत या दोन्ही अप्रतिम आहेत. डोसा तयार करतानाचा त्याचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती समजू शकलेली नाही. मात्र, नेटकरी या व्हिडीओला अतिशय पसंद करत असून त्याला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | छोट्याशा कुत्र्याला झोप अनावर, पडतोय पक्ष्याच्या अंगावर, मजेदार व्हिडीओ एकदा पहायलाच हवा !

Video | नव्या जोडीवर पैशांचा पाऊस, दिलदार मित्रांचा व्हिडीओ एकदा पाहाच

Video | वर्ल्ड रेकॉर्डसाठी सुरु होता सराव, खतरनाक स्टंट करताना मृत्यू, व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ

(man throws dosa in air before serving to customers video went viral on social media flying dosa)

Follow Us
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!