Video | नव्या जोडीवर पैशांचा पाऊस, दिलदार मित्रांचा व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या अशाच काही मित्रांचा आणि नव्या नवरी-नवरदेवांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरी-नवरदेवाच्या मित्रांनी त्यांच्यावर पैशांचा चक्क पाऊस पाडला आहे.

Video | नव्या जोडीवर पैशांचा पाऊस, दिलदार मित्रांचा व्हिडीओ एकदा पाहाच
MARRIED COUPLE VIRAL VIDEO

मुंबई : लग्नाचा दिवस हा नवरी-नवरदेवांसाठी खास असतो. हा दिवस अविस्मरणीय ठरावा यासाठी सगळेच प्रयत्न करतात. मात्र, हा दिवस स्मरणात ठेवण्यासाठी नवरी-नवरदेवांच्या मित्रमंडळीचासुद्धा वाटा तेवढाच महत्त्वाचा असतो. सध्या अशाच काही मित्रांचा आणि नव्या नवरी-नवरदेवांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरी-नवरदेवाच्या मित्रांनी त्यांच्यावर पैशांचा चक्क पाऊस पाडला आहे. (Rain of cash on newly married couple bride groom video went viral on social media)

नवरी-नवरदेवाभोवती मित्रांची गर्दी

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अतिशय विशेष आहे. कारण या व्हिडीओमध्ये नवरी-नवरदेवाचे मित्र त्यांच्यावर चक्क पैशांची उधळण करत आहेत. या व्हिडीओमध्ये नवविवाहित दाम्पत्य एका मोठ्या खुर्चीवर बसल्याचे दिसतेय. नवऱ्या मुलाने भारदस्त असा कोट घातला आहे. तर नवरीने लाल रंगाचा आकर्षक ड्रेस परिधान केला आहे. दोघेही पांढऱ्या रंगाच्या खुर्चीवर बसले आहेत. त्यानंतर या दाम्पत्याच्या बाजूला त्यांच्या मित्रांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. जवळपास पाच ते सहा मित्रांनी त्यांच्याभोवती अक्षरश: गराडा घातला आहे.

मित्रांकडून पैशांची उधळण

हे सर्व मित्र बसलेल्या दाम्पत्यांवर पैशांची उधळण करत आहेत. हातातील पैसे संपल्यानंतर ते लगेच खिशातील पैशांच्या नोटा काढत आहेत. नवरी आणि नवरदेव अशा दोघांवरही हे मित्र पैसे उधळत आहेत. कशाचीही तमा न बाळगता या मित्रांचा पैसे उधळण्याचा कार्यक्रम सुरु आहे. मित्रांच्या या पैसे उधळण्यामुळे नवरी तसेच नवरदेव यांच्या समोर नोटांचा ढिग लागला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी या नव्या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी या पैशांमुळे नवरी-नवरदेवाची तर लॉटरी लागली, असे म्हटले आहे. सध्या व्हायरल होत असेलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र, त्याला trending_wedding_couples या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलेले आहे. सध्या हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात पाहत आहेत.

इतर बातम्या :

Video | वर्ल्ड रेकॉर्डसाठी सुरु होता सराव, खतरनाक स्टंट करताना मृत्यू, व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ

Video | प्रेमाने जवळ गेली अन् मध्येच झाला घोळ, उंदीर ड्रेसमध्ये घुसल्यामुळे पंचाईत, महिलेचा व्हिडीओ व्हायरल

Video | नटलेल्या बायकांची पार्टीमध्ये धम्माल, मजेत पाजतायत एकमेकींना दारु, व्हिडीओ एकदा पाहाच

(Rain of cash on newly married couple bride groom video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI