AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे आमदार धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, थेट भेट घेत…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असता त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या विमान अपघाताने मोठी खळबळ उडाली. या अपघाताची चाैकशी केली जात आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे आमदार धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, थेट भेट घेत...
Ajit Pawar party MLA
| Updated on: Feb 16, 2026 | 11:52 AM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे प्रचार सभांसाठी निघाले असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अगदी बारामती विमानतळाच्या शेजारीच हा अपघात झाला. या विमान अपघाताचे काही धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ पुढे आली. विमान आकाशात असताना एका बाजूला झुकताना दिसले. विमान अपघातानंतर एकही व्यक्ती वाचली नाही. अजित पवार यांच्या जाण्याने राज्यातील राजकारणात भूकंप आला. मात्र, यादरम्यानच पवार कुटुंबातील वादही पुढे आला. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अनेकांनी या शपथविधीनंतर टीका केली. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सध्या चाैकशी केली जात आहे. मात्र, अनेकांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार यांनी देखील या विमान अपघातानंतर पत्रकार परिषद घेत काही मुद्दे उपस्थित केली.

आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. हेच नाही तर मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या निधनानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटातील आमदारांमध्ये अस्वस्था बघायला मिळत आहे. हेच नाही तर काही जणांनी थेट खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतल्याचीही माहिती मिळत आहे.

अजित पवार गटाचे 30 ते 32 आमदार थेट शरद पवार गटाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही आमदारांनी थेट सुप्रिया सुळे यांची भेटही घेतली. तुल्यबळ नेतृत्व राष्ट्रवादी गटाकडे नसल्याची आमदारांमध्ये भीती असल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर या आमदारांना भविष्याची चिंता असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये ज्या प्रकारचे नेतृत्व आहे, त्याप्रकारचे नेतृत्व अजित पवार यांच्या जाण्यानंतर पक्षात दिसत नसल्याने आमदारांमध्ये चिंता आहे. यादरम्यान काही आमदारांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली तर काही आमदार फोनच्या माध्यमातून संपर्कात आहेत. अजित पवार असताना या आमदारांना कशाची चिंता नव्हती पण आता ते अस्वस्थ असल्याच बोलले जात आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात