Video | वर्ल्ड रेकॉर्डसाठी सुरु होता सराव, खतरनाक स्टंट करताना मृत्यू, व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ

अमेरिकेतील प्रसिद्ध स्टंटमॅन अ‌ॅलेक्स हार्विल यांच्यासोबतही असंच काहीसं झालं आहे. एका स्टंटचा सराव करताना त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

Video | वर्ल्ड रेकॉर्डसाठी सुरु होता सराव, खतरनाक स्टंट करताना मृत्यू, व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ
Alex Harvill viral video
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jun 19, 2021 | 6:17 PM

मुंबई : प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक वेगवेगळ्या प्रकारचे साहस दाखवून आपल्या नावावर त्या रेकॉर्डची नोंद करतात. वेगवेगळ्या प्रकारचे टास्क पूर्ण करुन हे लोक या करामती करत असतात. त्यांनी करुन दाखवलेल्या या अभूतपूर्व कामांची संपूर्ण विश्व दखल घेतं. मात्र, धाडसी कामे करुन रेकॉर्ड तयार करणाऱ्या या लोकांसोबत कधीकधी अशा काही घटना घडतात ज्या पाहून अंगाचा थरकाप उडतो. अमेरिकेतील प्रसिद्ध स्टंटमॅन अ‌ॅलेक्स हार्विल (Alex Harvill death) यांच्यासोबतही असंच काहीसं झालं आहे. एका स्टंटचा सराव करताना त्यांचा मृत्यू झाला असून या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. (American stuntman Alex Harvill died while practicing bike stunt video went viral on social media)

स्टंटचा सराव करताना दुर्दैवी मृत्यू

अ‌ॅलेक्स हार्विल हे अमेरिकेतील एक प्रसिद्ध असे स्टंटमॅन आहेत. साहसी उड्या घेणाऱ्यांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. यापूर्वी अनेकवेळा त्यांनी शेकडो फुटाच्या उंचीवरुन उड्या घेतलेल्या आहेत. सध्या ते दुचाकीवर बसून 351 फुट उंचावरुन उडी मारण्याचा सराव करत होते. याच सरावादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मोसेस लेक एअरशोमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित करण्याची इच्छा 

मिळालेल्या माहितीनुसार अ‌ॅलेक्स हार्विल हे वॉशिंग्टन येथे सुरु असलेल्या मोसेस लेक एअरशोमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यासाठी सराव करत होते. यावेळी वॉर्मअप करताना पहिल्याच उडीदरम्यान त्यांच्यासोबत ही दुर्घटना घडली. तोल ढासळल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ :

दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान अ‌ॅलेक्स हार्विल यांच्यासोबत झालेल्या दुर्घटनेचा हा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये हार्विल एका उंच अशा रॅम्पवर दुचाकीवरुन उडी घेताना दिसत आहेत. यावेळी रॅम्पवरुन उडी घेतल्यानंतर हवेत असताना त्यांचा तोल ढासळल्याचे दिसतेय. त्यानंतर समोरच्या वाळूच्या ढिगाऱ्यावर ते पडले आहेत. नंतर याच दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

इतर बातम्या :

Video | प्रेमाने जवळ गेली अन् मध्येच झाला घोळ, उंदीर ड्रेसमध्ये घुसल्यामुळे पंचाईत, महिलेचा व्हिडीओ व्हायरल

Video | नटलेल्या बायकांची पार्टीमध्ये धम्माल, मजेत पाजतायत एकमेकींना दारु, व्हिडीओ एकदा पाहाच

Viral Video : द्राक्ष खाण्यासाठी जोडप्याचे जबरदस्त जुगाड, व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू फुटेल

(American stuntman Alex Harvill died while practicing bike stunt video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें