AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ishan Kishan: इशान किशनच्या लग्नाबाबत आजोबा जाहीरपणे बोलले…; या मॉडेलच्या नावाची चर्चा

Ishan Kishan: ट्वेन्टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव केल्यानंतर टीम इंडियाचा इशान किशन तुफान चर्चेत आहे. इशानच्या लग्नाबद्दलच्या चर्चांदरम्यान त्याचे आजोबा अनुराग पांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ishan Kishan: इशान किशनच्या लग्नाबाबत आजोबा जाहीरपणे बोलले...; या मॉडेलच्या नावाची चर्चा
Ishan KishanImage Credit source: PTI
| Updated on: Feb 16, 2026 | 11:50 AM
Share

टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर आणि बॅट्समन इशान किशन सध्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करताना दिसतोय. रविवारी कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाकिस्तानविरोधी सामन्यात त्याने धडाकेबाज फलंदाजी केली. या हाय-व्होल्टेज सामन्यादरम्यान इशानच्या आक्रमक खेळीवर सर्वांची नजर टिकून होती. मॅचमधील या उल्लेखनीय कामगिरीनंतर इशान किशनचं खासगी आयुष्यसुद्धा चर्चेत आलं आहे. त्याच्या लग्नाच्या चर्चांदरम्यान कुटुंबीयांकडून मोठी आणि तितकीच स्पष्ट प्रतिक्रिया समोर आली आहे. इशानचे आजोबा अनुराग पांडे यांनी नातवाच्या लग्नाबाबत मोकळी प्रतिक्रिया दिली आहे.

इशानच्या आजोबांनी स्पष्टपणे सांगितलं की त्याच्या प्रत्येक निर्णयात कुटुंब त्याच्यासोबत आहे. तो जिच्याशी लग्न करेल, तिला ते पूर्णपणे मान्य करतील. याविषयी ते पुढे म्हणाले, “इशान ज्या कोणत्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेईल, तिचा आम्ही स्वीकार करू. आमच्यासाठी मुलाचा आनंद सर्वांत महत्त्वाचा आहे. त्यामुळे लग्नाबाबतचा अंतिम निर्णय त्याचा असेल आणि आम्ही त्याच्या पाठिशी उभे आहोत.” गेल्या काही दिवसांपासून इशानच्या रिलेशनशिपबद्दल बऱ्याच चर्चा होत्या, त्यामुळे आता त्याच्या आजोबांची प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.

यादरम्यान इशानच्या आजोबांनी असंही सांगितलं की अदिती नावाच्या एका तरुणीचं इशानच्या आयुष्यात खास महत्त्व आहे. त्यांच्या मते, अदिती ही जयपूरची राहणारी असून ती मॉडेल आहे. इतकंच नाही तर मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेत तिने दुसरं स्थान पटकावलं होतं. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आजोबांनी एक रंजक किस्सासुद्धा सांगितला. त्यांनी सांगितलं की अदितीने त्यांची एक मुलाखत पाहिली होती आणि इशानसमोर तिने खूप कौतुक केलं होतं. “तुझे आजोबा या वयातसुद्धा किती हँडसम, सुंदर आहेत, त्यांचा चेहरा चमकतोय.. अशा शब्दांत तिने माझं कौतुक केलं होतं,” असं अनुराग पांडे हसत म्हणाले.

इशानच्या लग्नाबाबत त्याच्या कुटुंबाची भूमिका स्पष्ट आहे. इशानने त्याच्या आयुष्याचे निर्णय स्वत:च घ्यावेत आणि त्याला कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा असेल, अशी भूमिका त्याच्या आजोबांनी मांडली आहे. ते पुढे म्हणाले, “त्याला जे काही करायचं आहे, ते तो करू शकतो. आम्ही ते स्वीकारण्यास तयार आहोत. आम्हाला कोणतीही चिंता नाही.”

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात