Video | छोट्याशा कुत्र्याला झोप अनावर, पडतोय पक्ष्याच्या अंगावर, मजेदार व्हिडीओ एकदा पहायलाच हवा !

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 19, 2021 | 11:01 PM

सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे चांगलेच चर्चेत राहतात. प्राण्यांची, पक्ष्यांच्या व्हिडीओची तर समाजमाध्यमावर विशेष चर्चा असते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे, या व्हिडीओमध्ये एक गोड कुत्रा झोपेसाठी वेडा झाला आहे.

Video | छोट्याशा कुत्र्याला झोप अनावर, पडतोय पक्ष्याच्या अंगावर, मजेदार व्हिडीओ एकदा पहायलाच हवा !
sleeping dog and bird
Follow us

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे चांगलेच चर्चेत राहतात. प्राण्यांची, पक्ष्यांच्या व्हिडीओची तर समाजमाध्यमावर विशेष चर्चा असते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक गोड कुत्रा झोपेसाठी वेडा झाला आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अतिशय मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. (cute puppy trying to sleep and rest on bird video went viral on social media)

कुत्र्याला येतेय झोप

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक छोटासा पांढऱ्या रंगाचा कुत्रा दिसतोय. हा कुत्रा दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. कुत्र्याचं हेच रुप पाहून नेटकरी वेडावले आहेत. या कुत्र्याच्या बाजूलाच एक पक्षीसुद्धा उभा आहे. दोघांची मैत्री असावी म्हणून ते एकमेकांच्या बाजूला थांबले आहेत. यातील कुत्र्याला चांगलीच झोप येत आहे. डोळ्यांमध्ये झोप भरलेली असल्यामुळे हा कुत्रा जागेवरच डुलक्या घेत आहे. त्याला झोपायचे नसावे पण झोप डोळ्यात भरल्यामुळे त्याला काही समजत नाहीये.

झोपेत पक्ष्याच्या अंगावर पडतोय कुत्रा

तो मध्येच झोपत आहे. झोप आल्यामुळे तो थेट बाजूला बसलेल्या पक्ष्याच्या अंगावर पडतो आहे. पक्ष्याच्या अंगावर पडल्यानंतर हा कुत्रा पुन्हा स्वत:ला सावरत असल्याचे दिसत आहे. मात्र झोप प्रचंड झोप आल्यामुळे हा कुत्रा पुन्हा एकदा बाजूच्या पक्ष्याच्या अंगावर पडतो आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

कुत्र्याला येत असलेली झोप आणि कुत्र्याच्या झोपेमुळे बाजूच्या पक्ष्याची उडत असलेली धांदल यामुळे हा व्हिडीओ लोक आवडीने पाहत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला Buitengebieden या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. सध्या हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच खुश होत आहेत. तसेच नेटकरी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देत आहेत.

इतर बातम्या :

Video | नव्या जोडीवर पैशांचा पाऊस, दिलदार मित्रांचा व्हिडीओ एकदा पाहाच

Video | वर्ल्ड रेकॉर्डसाठी सुरु होता सराव, खतरनाक स्टंट करताना मृत्यू, व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ

Video | प्रेमाने जवळ गेली अन् मध्येच झाला घोळ, उंदीर ड्रेसमध्ये घुसल्यामुळे पंचाईत, महिलेचा व्हिडीओ व्हायरल

(cute puppy trying to sleep and rest on bird video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI