AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | लग्नानंतर नात्यामध्ये काय बदल होतो ? मजेदार व्हिडीओ पाहाच

सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये लग्न झाल्यानंतर तसेच लग्नाआधी पती आपल्या पत्नीला माफी कशी मागतो हे मजेशीरपणे दावखवण्यात आले आहे.

Video | लग्नानंतर नात्यामध्ये काय बदल होतो ? मजेदार व्हिडीओ पाहाच
marriage viral video
| Edited By: | Updated on: Jun 20, 2021 | 3:48 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे थरराक तर काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असे असतात. खळखळून हसायला लाववणाऱ्या व्हिडीओंची तर सोशल मीडियावर विशेष चर्चा होते. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये लग्न झाल्यानंतर तसेच लग्नाआधी पती आपल्या पत्नीला माफी कशी मागतो हे मजेशीरपणे दावखवण्यात आले आहे. (what changes occur after marriage funny video went viral on social media)

लग्नानंतर सगळ्या सवयी बदलतात

लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे पर्व असते. लग्न झाल्यानंतर व्यक्तीच्या आयुष्यात अनेक बदल होतात. लग्नानंतर सगळ्या सवयी बदलतात. लग्न झाल्यानंतर एक जबाबदारी आल्यामुळे प्रत्येक निर्णय घेताना विचार करावा लागतो. आर्थिक दृष्टीकोनातून जशा गोष्टी बदलतात अगदी तशाच प्रकारे दोघांच्या नात्यांमध्ये, रुसवा-फुगवा व्यक्त करण्यामध्येसुद्धा बदल होतो. लग्नाआधीच्या सवयी तसेच लग्नानंतर झालेला बदल या व्हिडीओमध्ये अगदी चांगल्या प्रकारे दाखवण्यात आला आहे.

लग्नाआधी राग घालवण्यासाठी फुलांची भेट

या व्हिडीओमध्ये एक कपल आहे. या कपलमधील महिला लग्नाआधी जेव्हा रुसते तेव्हे तिची समजूत काढण्यासाठी व्हिडिओतील तरुण तिला भेट म्हणून फुलं घेऊन जातो. तर हाच तरुण लग्नानंतर एकमद बदललेला  आहे. लग्न झाल्यानंतर बायकोचा राग घालवण्यासाठी आता तो फुलं घेऊन जात नाहीये. तर तो चक्क घरातील कामे करतो आहे.

लग्नानंतर राग घालवण्यासाठी घरकाम

लग्न झाल्यानंतर आपल्या बायकोची समजूत काढण्यासाठी हा तरुण घरातील कामं करतो आहे. तो फरशी पुसणे, भांडे घासणे तसेच बेड व्यवस्थित करण्याचे काम करतो आहे. म्हणजेच लग्न होण्यापूर्वी सगळे गुलाबी दिवस असतात. मात्र, लग्न झाल्यानंतर सगळं काही बदलून जातं, असं या व्हिडीओमध्ये अगदीच मजेदारपणे सांगण्यात आले आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ शुट करणाऱ्यांचे नाव समजू शकलेले नाही. मात्र, त्याला trendingdulhaniya या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. लोक या व्हिडीओला पाहून मजेदारपणे कमेंट्स करत आहेत. तसेच या व्हिडीओला नेटकरी मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | महिला पोलिसाची अरेरावी, कोरोना नियम मोडून म्हणते “होमगार्ड आहेस, होमगार्डसारखे राहा..”

Video | ग्राहकांना सेवा देण्याची अनोखी पद्धत, थेट हवेत फेकतो डोसा, पाहा मजेदार व्हिडीओ

Video | छोट्याशा कुत्र्याला झोप अनावर, पडतोय पक्ष्याच्या अंगावर, मजेदार व्हिडीओ एकदा पहायलाच हवा !

(what changes occur after marriage funny video went viral on social media)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...