AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | फुलपाखराचं ऑपरेशन कधी पाहिलंत ?, नसेल तर हा खास व्हिडीओ पाहाच

तळहातावर मावणाऱ्या फुलपाखराचं ऑपरेशन तुम्ही कधी पाहिलंत का ?, नसेल तर हा खास व्हिडीओ तुमच्यासाठीच आहे. (butterfly surgery viral video)

Video | फुलपाखराचं ऑपरेशन कधी पाहिलंत ?, नसेल तर हा खास व्हिडीओ पाहाच
butterfly video
| Updated on: Apr 24, 2021 | 11:45 PM
Share

मुंबई : प्राण्यांची काळजी घेणं अनेकांना आवडतं. काही जण तर स्वखुशीने हे काम करतात. काहींनी तर प्राण्यांची काळजी घेण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेलं आहे. प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी प्राणीवैद्यक शास्त्रात रोज नवनवीन प्रयोग आणि संशोधन होतात. प्राण्यांचे वेगवेगळे ऑपरेशन होतानाचे व्हिडीओ तुम्ही यापूर्वी अनेकदा पाहिले असतील. इंटरनेटवर एका क्लिकवर ते उपलब्ध होतात. मात्र, तळहातावर मावणाऱ्या फुलपाखराचं (Butterfly) ऑपरेशन तुम्ही कधी पाहिलंत का ?, नसेल तर हा खास व्हिडीओ तुमच्यासाठीच आहे. (butterfly surgery video goes viral on internet)

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?

सोशल मीडियावर एका फुलपाखराचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये एका लहानशा फुलपाखऱाचे ऑपरेशन होताना दावण्यात आलंय. या व्हिडीओमध्ये माणसाने एका छोट्याशा फुलपाखराला टिश्यू पेपरवर ठेवलं आहे. तसेच या माणसाने नंतर फुलपाखराचे एक पंख कापले आहे. तसेच, पंख कापल्यानंतर फुलपाखराला एका नेटमध्ये ठेवण्यात आलंय. थोड्या वेळानंतर एका मेलेल्या फुलपाखराचे पंख कापून नंतर तेच पंख नेटमध्ये ठेवलेल्या फुलपाखराच्या कापलेल्या पंखावर ग्लूच्या माध्यमातून चिटकवण्यात आलंय. त्यानंतर या फुलपाखराला अंडर ऑब्झर्व्हेशनमध्ये ठेवून काही दिवसांनी सोडून देण्यात आलंय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओला एकूण 19 मिलीयन व्ह्यूज

फेसबुक वर Biólogos De Nacimiento नावाच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. व्हिडीओच्या शेवटी ऑपरेशन केलेले फुलपाखरु यशस्वीपणे हवेत उडत असल्याचेसुद्धा दिसतेय. याच कराणामुळे हा व्हिडीओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनलाय. अनेकांनी या व्हिडीओवर उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिल्या आहेत. या तीन मिनिटांच्या व्हिडीओला आतापर्यंत एकूण 19 मिलियन लोकांनी पाहिले आहे.

इतर बातम्या :

VIDEO | चार वेळा बघण्याचा कार्यक्रम, साखरपुडाही झाला, नवरा म्हणतो नवरीच्या डोळ्यात दोष, वधूपक्षाने धू-धू धुतला

VIDEO : सेक्स एज्युकेशन विषयी माहिती सांगणारा मिल्कशेकचा व्हिडीओ, अनेकांकडून आक्षेप, मोठा गदारोळ, अखेर ऑस्ट्रेलिया सरकार नमलं

VIDEO | बाहेर जाऊ नकोस, कोरोना होईल, आजीचा पदर धरत चिमुकलीची आर्त हाक

(butterfly surgery video goes viral on internet)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...