VIDEO : सेक्स एज्युकेशन विषयी माहिती सांगणारा मिल्कशेकचा व्हिडीओ, अनेकांकडून आक्षेप, मोठा गदारोळ, अखेर ऑस्ट्रेलिया सरकार नमलं

ऑस्ट्रेलियात लैंगिक शिक्षण शिबिर ही ऑनाईन मोहिम असून 14 ते 17 वयोगटातील मुलांना यामध्ये शिक्षण दिलं जात आहे (Australia Government removed milkshake sex education video from website)

VIDEO : सेक्स एज्युकेशन विषयी माहिती सांगणारा मिल्कशेकचा व्हिडीओ, अनेकांकडून आक्षेप, मोठा गदारोळ, अखेर ऑस्ट्रेलिया सरकार नमलं
सेक्स एज्युकेशन विषयी माहिती सांगणाऱ्या मिल्कशेकच्या व्हिडीओवर अनेकांचा आक्षेप
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jul 13, 2021 | 11:19 AM

कॅनबेरी (ऑस्ट्रेलिया) : बलात्कार, विनयभंग यांसारख्या घटनांवर आळा बसावा यासाठी मुलांना योग्य वयात लैंगिक शिक्षण (Sex Education) देणं योग्य असल्याचं मत तज्ज्ञ देतात. यासाठी ऑस्ट्रेलियात (Australia) सरकारकडून एक मोहिम राबविण्यात आली. मात्र, मुलांना लैंगिक शिक्षणासाठी जो एक व्हिडीओ दाखवण्यात आलाय त्यावरुन मोठा गदारोळ बघायला मिळाला. अनेकांनी त्या व्हिडीओवर आक्षेप घेतला. त्यामुळे अखेर ऑस्ट्रेलिया सरकारला याप्रकरणी माघार घ्यावी लागली. सरकारने संबंधित व्हिडीओ अधिकृत वेबसाईटवरुन काढून टाकला आहे (Australia Government removed milkshake sex education video from website).

नेमकं प्रकरण काय?

ऑस्ट्रेलियात लैंगिक शिक्षण शिबिर ही ऑनाईन मोहिम असून 14 ते 17 वयोगटातील मुलांना यामध्ये शिक्षण दिलं जात आहे. ऑस्ट्रेलिया सरकारकडून रिस्पेक्ट मॅटर्सच्या अंतर्गत सेक्स संबंधित शिक्षण देण्यासाठी The Good Society नावाच्या वेबसाईटवर 350 व्हिडीओज, स्टोरीज आणि पॉडकॉस्ट अपलोड केले आहेत. या व्हिडीओजच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियातील सर्व शाळांच्या 14 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण दिलं जातं. अर्थात ही मोहिम चांगली जरी असली तरी या मोहिमे अंतर्गत ज्या पद्धतीने शिक्षण दिलं जात आहे त्यावर काही सामाजिक कार्यकर्ते आणि तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे (Australia Government removed milkshake sex education video from website).

तज्ज्ञांकडून चिंता का व्यक्त केली जातेय?

The Good Society वेबसाईटवर सेक्स संबंधाच्या सहमतीसाठी जे व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत ते व्हिडीओ उलटअर्थी भ्रम किंवा शंका निर्माण करणारे आहेत. संबंधित व्हिडीओजमधून जो संदेश द्यायचा आहे तो योग्यपणे न जाता, त्याबाबत संभ्रम निर्माण होत आहे, असं काही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

तज्ज्ञांचा आक्षेप असणाऱ्या व्हिडीओत नेमकं काय?

एका व्हिडिओमध्ये एक किशोरवयीन मुलगी आपल्या बॉयफ्रेंडच्या सहमतीशिवाय तिच्या चेहऱ्यावर मिल्कशेक लावते. तर दुसऱ्या एका व्हिडीओत एक मुलकी शार्क माश्यासोबत पोहण्यासाठी घाबरत आहे. तर तिचा बॉयफ्रेंड तिला त्यासाठी आग्रह करत आहे.

या व्हिडीओंमधून जोडीदाराच्या मनाविरुद्ध काही करु नका, असा संदेश द्यायचा आहे. मात्र, संबंधित प्रकार स्पष्टपणे देखील सांगता येऊ शकतो. उलट जितकं स्पष्टपणे सांगितलं तितकं मुलांना लवकरही समजेल, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे अनेकांनी या व्हिडीओजवर आक्षेप घेतला. अखेर लोकांचा वाढता आक्षेप बघता ऑस्ट्रेलिया सरकारने संबंधित व्हिडीओ वेबसाईटवरुन हटवले.

व्हिडीओ बघा :

हेही वाचा : बालपणी माझे लैंगिक शोषण झाले होते; आमिर खानच्या मुलीचा खळबळजनक खुलासा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें