CNAP Rule: दुसऱ्याच्या नावाने रजिस्टर्ड सिम वापरत असाल तर सावधान, १ नोव्हेंबरपासून नियमात हा बदल

CNAP Rule: १ नोव्हेंबरपासून मोबाईल कॉलिंगमध्ये एक खूप मोठा नियम बदलणार आहे. आता अनोखळी कॉल आल्यानंतर देखील स्क्रीनवर त्या व्यक्तीचे नाव दिसणार आहे. जर तुम्ही दुसऱ्याचे सिम वापरत असाल तर कोणाचे नाव दिसणार ? नियम जाणून घ्या....

CNAP Rule: दुसऱ्याच्या नावाने रजिस्टर्ड सिम वापरत असाल तर सावधान, १ नोव्हेंबरपासून नियमात हा बदल
CNAP Caller name shown
| Updated on: Oct 31, 2026 | 5:00 PM

CNAP Rule: उद्या १ नोव्हेंबर पासून देशातील कोट्यवधी फोन युजर्ससाठी कॉलिंगशी संबंधित नियमात बदल होणार आहे. टेलिकॉम कंपन्या उद्यापासून देशभरातील कॉलर नेम प्रेझेंटेशन म्हणजे CNAP सर्व्हीस लागू करणार आहे. आता पर्यंत जेव्हा तुमच्या फोनवर अज्ञात व्यक्तीच्या नंबरने कॉल येत होता तेव्हा स्क्रीनवर नंबर फ्लॅश होत होता. कॉल कोणाचा आहे हे जाणण्यासाठी आपल्या थर्ड पार्टी कॉलर आयडी ऐप्सचा वापर करावा लागत होता.

परंतू आता १ नोव्हेंबरपासून कोणत्या ऐप्सशिवाय तुम्हाला तुमच्या फोनच्या स्क्रीनवर कॉल करणाऱ्यांचे खरे नाव दिसणार आहे. दूरसंचार विभागाने वाढते सायबर फ्रॉड आणि फर्जी कॉल्सवर लगाम लावण्यासाठी हे मोठे पाऊल उचलले आहे. मात्र, या नव्या नियमामुळे त्या कोट्यवधी लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे. जे आप आपल्या आई-वडीलांचे , बहिण – भावाचे वा अन्य कुटुंबियांच्या नावे घेतलेल्या सिमचा वापर करत आहेत.

Loading...

दुसऱ्याच्या नावे आहे सिम,  स्क्रीनवर कोणाचे नाव येणार ?

भारतात सिमकार्ड घरातील कोणत्याही सदस्याच्या नावाने घेतलेले असले तरी ते वापरण्याचा प्रघात आहे. त्यामुळे तुम्ही नातलगाच्या नावाने खरेदी केलेले सिम वापरत असाल तर CNAP नियम लागू झाल्याने सर्वात मोठे कन्फ्युजन हे आहे की कॉल केल्यानंतर कोणाचे नाव पलिकडच्या व्यक्तीच्या फोन स्क्रीनवर दिसेल ? नियमानुसार CNAP सिस्टीम संपूर्णपणे टेलिकॉम कंपन्यांच्या केवायसी डेटाबेसवर काम करते.

त्यामुळे सिम खरेदीच्या वेळी ज्या व्यक्तीचे आधारकार्ड वा अन्य ओळखपत्र दिले असेल कंपनीच्या रेकॉर्डनुसार तोच खरा मालक आहे. त्यामुळे तुम्ही जर अन्य नातलगाच्या नावाने रजिस्टर्ड सिम वापरत असाल आणि एखाद्या अनोळखी नंबरवर कॉल करत असाल तर समोरच्याच्या स्क्रीनवर तुमचे नव्हे तर तुमच्या नातलगाचे नाव झळकेल. तर कॉल केल्यावर तुमचे नाव दिसावे असे तुम्हाला वाटत असेल तर टेलिकॉम ऑपरेटरकडे जाऊन सिमला तुमच्या नावावर ट्रान्सफर करावे लागेल किंवा पोर्ट करावे लागेल.

आधीपासून सेव्ह केलेल्या नंबर्सचे काय होईल?

ही नवीन सरकारी कॉलर आयडी प्रणाली थर्ड-पार्टी ॲप्सपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आणि अधिक विश्वासार्ह पद्धतीने काम करेल. थर्ड-पार्टी ॲप्स लोकांना त्यांच्या आवडीचे कोणतेही नाव टाकण्याची परवानगी देते. मात्र, CNAP थेट टेलिकॉम कंपनी रजिस्टर्ड नावे घेईल. जेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती तुम्हाला कॉल करेल, तेव्हा फोनच्या डिस्प्लेवर सर्वात वर त्यांचा मोबाईल नंबर दिसेल आणि त्याच्या थेट खाली सिम कार्ड धारकाचे अधिकृत नोंदलेले नाव दिसेल.

जर तुम्ही तुमच्या फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये एखाद्या व्यक्तीचा नंबर आधीच एका विशिष्ट नावाने सेव्ह केला असेल, तर स्क्रीनवर सर्वात आधी ते सेव्ह केलेले नाव दिसेल. शिवाय, जर कॉल परदेशातून येत असेल, तर नंबरच्या बाजूला स्पष्टपणे “आंतरराष्ट्रीय कॉल” (International Call) असे दिसेल. यामुळे लोकांना परदेशी नंबरवरून होणाऱ्या फसवणुकीबद्दल सतर्क केले जाईल.

कंपन्यांसाठी काय नियम आहेत?

सुरुवातीच्या टप्प्यात, हे वैशिष्ट्य उद्यापासून देशातील सर्व 4G आणि 5G नेटवर्क वापरकर्त्यांसाठी डीफॉल्टनुसार सक्षम केले जात आहे. यासाठी तुम्हाला वेगळे ॲप डाउनलोड करण्याची किंवा तुमच्या फोनमधील कोणतीही सेटिंग बदलण्याची आवश्यकता नाही. २जी आणि ३जी नेटवर्क वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी ही सुविधा नंतरच्या काळात स्वतंत्रपणे लागू केली जाईल. व्यवसाय आणि कंपन्यांसाठीही विशेष नियम तयार करण्यात आले आहेत.

जर एखाद्या कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांच्या फोनवरून कॉल केल्यावर आपल्या कंपनीचे किंवा ब्रँडचे नाव दिसावे असे वाटत असेल, तर त्यांना दूरसंचार कंपनीकडे जीएसटी किंवा ट्रेडमार्क नोंदणीची कागदपत्रे सादर करून आपले नाव अद्ययावत करावे लागेल. वापरकर्त्याच्या गोपनीयतेचा विचार करून, कॉल डिस्कनेक्ट झाल्यानंतर कॉलरचे नाव सिस्टीममध्ये साठवून न ठेवण्याच्या सूचनाही कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us